Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना गोविंद बागेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. ऊस उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी आपण गोविंद बागेत जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, शरद पवारांकडून आपल्याला गोविंद बागेचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे आपण पवारांची भेट घेणार आहोत. या भेटीदरम्यान ऊस शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासोबतच राहुल गांधी यांना इथेनॉलचे धोरण समजावून सांगण्याबाबत विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवरही भाष्य केले.
महाराष्ट्रातील रस्त्यांच्या खराब अवस्थेबाबत मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली. "मी नंदुरबार जिल्हाचा पालकमंत्री आहे, महिन्यातून एक दोन वेळा जात असतो. सुरतवरून नंदुरबारला ३ तासाचा रस्ता आहे. २ तास चांगला रस्ता व महाराष्ट्रामधील १ तासाचा रस्ता खराब आहे. गुजरात हद्दीतील रस्ते चांगले आहेत. म्हणून महाराष्ट्रातील खराब रस्त्यासंदर्भात मी बोललो. रस्त्याची अवस्था पाहून मला पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सत्तारुढ लोकांनी सुद्धा रस्त्यांची चांगली कामं केली पाहिजे. पावसाळ्यात रस्त्याबर खड्डे पडणार नाहीत असे तंत्रज्ञान आले पाहिजे. खराब रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना होणारा त्रास संपवता आला पाहिजे. अनेक सरकार आले आणि गेले पण हा रस्ता कायमचा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुश्रीफ यांनी राज्याच्या कर्जाबाबतही भूमिका स्पष्ट केली. मूलभूत विकासासाठी घेतलेले कर्ज हे योग्य प्रमाणात असून, राज्याने कोणताही नियम मोडून कर्ज घेतलेले नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणाचे नाव निश्चित झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. पण मुंबईत जाऊन मी त्याबाबत माहिती घेईन असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबतही मुश्रीफ यांनी महत्त्वाचे भाष्य केले. न्यायालयाने आणखी मुदतवाढ घेण्यासाठी न येण्याच्या सूचना दिल्याने प्रशासक मंडळाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे पुढील ६० दिवसांत निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती म्हणून ही निवडणूक एकत्रितपणे लढवली जाईल, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.