Maharashtra Contractors: फडणवीस सरकारने 86 हजार कोटी थकवले : कंत्राटदारांचा 18-19 ऑगस्टला आझाद मैदानातून एल्गार

Maharashtra government contractors news: महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांची ८६,६६२ कोटी रुपयांची थकबाकी; रखडलेल्या देयकांसाठी १८-१९ ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन.
Maharashtra government contractors news:
Maharashtra government contractors news:Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra contractor news: गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील कंत्राटदार मेटाकुटीला आले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या परिस्थितीचा देखील वेगळ्याच पद्धतीने फायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री (कै) अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थ खाते होते. तेव्हापासून सुमारे ९० हजार कोटी रुपयांची देणी थकीत होती. त्यामुळे राज्यभरातील कंत्राटदार आणि विशेषता सुशिक्षित बेरोजगार संकटात सापडले होते.

या कंत्राटदारांनी विविध बँका आणि आर्थिक संस्थांकडून अर्थसहाय्य घेऊन राज्य सरकारची ही कामे पूर्ण केली आहेत. हे पूर्ण होऊन देखील गेले पाच ते सहा वर्ष त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे कंत्राटदार संकटात सापडले आहेत.

सध्या अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांचे ८६ हजार ६६२ कोटी रुपयांची देयके अद्याप अदा होऊ शकलेली नाहीत. गेल्या काही वर्षांत ही स्थिती सातत्याने बिकट होत चालली आहे.

Maharashtra government contractors news:
IPS Officer Mother: IPS अधिकाऱ्याच्या 95 वर्षीय आईची घरात घुसून हत्या; तोंडात बोळा, सोन्याचे दागिनेही लुटले

महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने यासंदर्भात निर्वाणीचा इशारा दिला आहे. 18 आणि 19 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. पूर्वीही कंत्राटदारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्याच्या विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले होते.

सातत्याने पाठपुरावा करूनही राज्य सरकारकडून देयके मिळू शकलेली नाहीत. तिकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. दुसरीकडे अन्य पक्षातून घेतलेले आमदार आणि सत्ताधारी नेत्यांना खुश करण्यासाठी शेकडो कोटींच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यातून विकासकामांचे स्थिती अधिक बिकट होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर होऊ लागली आहे.

दुसरीकडे कंत्राटदार बँका आणि अन्य संस्थांकडून कर्ज घेतल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मात्र त्याचे सोयरे सुतक नाही. या स्थितीचा वेगळ्याच पद्धतीने गैरफायदा घेण्याचे काम सुरू आहे. रखडलेले पेमेंट अदा करण्यासाठी मंत्रालय आणि जिल्हास्तरावर अधिकारी स्वतःची तुंबडी भरून घेत आहेत. त्याला कंटाळून काही कंत्राटदारांनी यापूर्वीच आत्महत्या केली आहे.

Maharashtra government contractors news:
Prithviraj Chavan: गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते? माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘नागपूरच्या दोन नेत्यां’ची भीती

यामध्ये सर्वाधिक थकबाकी सार्वजनिक बांधकाम विभाग १७,५०० कोटी, आदिवासी विकास विभाग ९.८८१ कोटी. पाणीपुरवठा विभाग ४० हजार कोटी, जलसंपदा विभाग ७००० कोटी तर इतर विभागांची ११ हजार १०० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे निर्वाणीचा इशारा म्हणून राज्यातील कंत्राटदार मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com