Jayant Patil on Heavy Rain IN Pune
Jayant Patil on Heavy Rain IN Pune Sarkarnama
पुणे

Jayant Patil: भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला; जयंतरावांनी सत्ताधाऱ्यांना झोडपले!

Mangesh Mahale

Heavy Rain IN Pune: मुसळधार पावसामुळे शनिवारी पुणेकरांची तारांबळ उडाली. सांयकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुणेकरांना बसला. विजांच्या कडकडाटासह शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला.

ढगफुटीसारखी (Heavy Rain IN Pune) परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुणेकरांच्या या परिस्थितीवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले.

पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती, म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला, अशा खास पुणेरी टोमणा जयंतरावांनी सत्ताधाऱ्यांना हाणला आहे. पावसामुळे पुणेकरांची झालेल्या अवस्थेवरुन जयंतरावांनी एक्सवरून सत्ताध्याऱ्यांना झोडपले.

"शनिवारी पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे," असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुण्यात शनिवारी सांयकाळी अचानक मुसळधार पावासाला सुरुवात झाली. त्यामुळे कामावरुन परत जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. मध्यवस्तीतील रस्त्यांना नदीचेस्वरुप प्राप्त झाले होते. जोराचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मध्यरात्रीही पावसाचा जोर कायम होता.

पावसामुळे पुण्यात सुमारे ४० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT