Prakash Ambedkar: आंबेडकरांच्या 'वंचित'मुळे आघाडीचा चार ठिकाणी झाला 'गेम'

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Analysis:'वंचित'लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचाही पराभव झाला.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Analysis
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result AnalysisSarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi Analysis: वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आली नसली तरी महाविकास आघाडीची राजकीय समिकरणे बदलण्यास 'वंचित' कारणीभूत ठरली.

वंचित बहुजन आघाडीला दलित आणि मुस्लिमांची मते मिळाली, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा चार ठिकाणी पराभव झाला. अकोला, बुलढाणा, हातकणंगले आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये 'वंचित'मुळे (Vanchit Bahujan Aghadi) आघाडीच्या उमेदवाराचा पाडाव झाला.

इंडिया आघाडीतून ऐनवेळी बाहेर पडून प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला होता. 'वंचित'लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचाही पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रात "वंचित फॅक्टर"चा काय परिणाम झाला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 पैकी 35 जागा लढवल्या. सात ठिकाणी 'वंचित'ने अन्य पक्षांना पाठिंबा दिला होता.

नागपूर, बारामती, कोल्हापूर, अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता. सात जागांवर उमेदवार न देता, वंचित बहुजन आघाडीने त्याठिकाणी अन्य उमेदवारांना पाठिंबा दिला. यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका उमेदवाराचाही समावेश होता 2019च्या तुलनेत वंचित आघाडीला सुमारे 27 लाख मते कमी पडले आहेत.

वंचित आघाडीने सांगली, कोल्हापूर, बारामती नागपूर याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे कोल्हापुर, बारामती आणि सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले.

प्रकाश आंबेडकर जर आघाडीत असते तर आघाडीने 34 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या. अकोला आणि हिंगोली या दोन जागा सोडल्या तर सर्व जागावर 'वंचित'ला एक लाखांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. या लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीमुळे वंचित आघाडीच्या राजकीय भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Analysis
Sunil Shelke: माशी कुठं शिंकली? बारणेचं मताधिक्य का घटलं?; शेळके म्हणाले, 'दिवसा धनुष्यबाण अन् रात्री मशाल...'

अकोला

अकोल्यातून आंबेडकर स्वत: निवडणुकीच्या मैदानात होते, त्याठिकाणी तिंरगी लढत झाली. आंबेडकरांना सुमारे अडीच लाख मते मिळाली. काँग्रेसच्या अभय पाटील यांचा 40 हजार 626 मतांनी पराभव केला. आंबेडकर येथून आघाडीकडून उभे राहिले असते तर ते निवडणूक आले असते किंवा आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता तर तो उमेदवार निवडून आला असता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बुलढाणा

बुलढाण्यातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर यांचा 29 हजार 479 मतांनी पराभव झाला. याठिकाणी वंचितच्या वसंतराव मगर यांना ९८ हजार ४४१ मते मिळाली. ही मते जर खेडेकर यांनी मिळाली असती तर ते विजयी झाले असते.

हातकणंगले

हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा 13 हजार 426 मतांनी पराभव झाला. याठिकाणी वंचितचे उमेदवार डी.सी. पाटील यांना 32 हजार 696 मते मिळाली. त्यांच्यामुळे सत्यजीत पाटलांचा पराभव झाला.

उत्तर पश्चिम मुंबई

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 हजारांनी पराभव झाला. येथे वंचित चे उमेदवार परमेश्वर रंशुर यांना 10 हजार 52 मते मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com