Chandrakant Patil, CM Eknath Shinde Latest News  Sarkarnama
पुणे

हॅलो चंद्रकांतदादा...मी पुण्याला येऊ शकत नाही... भर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा फोन

Chandrakant Patil : आज पुण्यातील पाषाण सुस खिंड पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहणार होते.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजप (BJP) नेते आणि उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आज (ता.१६ सप्टेंबर) चालू कार्यक्रमात चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला. हवामान खराब असल्याने मुंबईहून पुण्याच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, त्यामुळे माझ्या वतीने तुम्हीच पुलाचे उद्घाटन करा,अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटलांना केली आहे.

आज पुण्यातील पाषाण सुस खिंड पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी त्यांना यायला जमले नाही. यामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडला. मात्र भर सभेत पाटलांना मुख्यमंत्र्याचा फोन आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. (Chandrakant Patil, CM Eknath Shinde Latest News )

झालं असं की, चंद्रकांत पाटील यांना कार्यक्रम सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला. यावेळी पाटील हे आपलं भाषण करत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्याचा फोन असल्याने पाटलांनी लगेच फोन घेतला. हवामान चांगले नसल्यामुळे मला मुंबईहून पुण्याला येता येणार नाही,असे मुख्यमंत्री शिंदेंनी पाटलांना सांगितले, यामुळे माझ्या वतीने तुम्हीच पुलाचे उद्घाटन करा,अशी माहिती पाटलांनी दिली आहे.

पुण्यात पाषाण सुस खिंड पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होता. मात्र त्यांना पुण्याला येता आले नाही. यामुळे माझ्या अनुपस्थितीत माझ्या वतीने तुम्हीच त्या पुलाचे उद्घाटन करा,असे शिंदेंनी सांगितले,असे चंद्रकांत पाटलांनी मीडियाशी बोलतांना सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्याऐवजी पाटलांनी पाषाण सुस खिंड पुलाचे उद्घाटन केले. मात्र मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहिले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी आज संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदेंच्या उपस्थितीत पार पडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT