आठवलेंना 'मनसे'चे वावडे; म्हणाले, त्यांच्या झेंड्याचा रंग बदलल्याने...

Ramdas Athawale : मुंबई पालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाव्या आणि उपमहापौर पद द्यावे...
Raj Thackeray- Ramdas Athawale latest news
Raj Thackeray- Ramdas Athawale latest news sarkarnama
Published on
Updated on

संभाजीनगर : राज ठाकरेंना (Raj Thackeray) युतीला कुठलाच फायदा नसल्याचं त्यांनी युतीत घेऊ नाही,अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी निळा व हिरवा आणि भगवा रंग वगळून एकच रंग हाती घेतल्याने त्यांचा आता युतीला काहीच फायदा होणार नसल्याचं आठवलेंनी म्हंटल आहे. त्यामुळे येणाऱ्या मुबई आणि राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत 'मनसे'ला (MNS) आठवले यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.

Raj Thackeray- Ramdas Athawale latest news
आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी मंत्री झालो नाही

दरम्यान राहुल गांधी यांच्या 'भारत जोडे' अभियानावरही टीका करताना आठवले म्हणाले की, 60 वर्षात ज्या काँग्रेसला भारत जोडता आला नाही तर राहुल गांधी यांना काय भारत जोडता येणार, असा टोलाही आठवलेंनी गांधींना लगावला.

Raj Thackeray- Ramdas Athawale latest news
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण : नवनीत राणांची मुंबई सत्र न्यायालयात धाव!

मुंबई पालिकेत आठवले गटाला 15 जागा मिळाव्या आणि उपमहापौर पद द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी युतीकडे केली आहे. शिवसेनेवर टीका करतांना ते म्हणाले की, शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह द्यावं. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करणार असल्याची टीकाही आठवलेंनी केली. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढण्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शिर्डी मतदारसंघात माझ्या विरुद्ध अपप्रचार करण्यात आल्याने माझा पराभव झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Raj Thackeray- Ramdas Athawale latest news
शिंदे गटात गेलेल्या 'या' आमदार, मंत्र्यांना सत्ता काही मानवेना...

दरम्यान 'वेदांता' सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. महाविकास सरकारने केंद्राला या बाबतच माहिती देणे गरजेचे होती. मात्र आघाडी सरकार अपयशी ठरल्याने हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला असल्याची टीकाही आठवलेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com