Hemant Rasne
Hemant Rasne Sarkarnama
पुणे

Hemant Rasne News : '' मुक्ता टिळकांना उमेदवारी दिली,त्यावेळी मी...''; हेमंत रासनेंचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे आज (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी भाजपकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यानंतर रासने यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

पुण्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. रासने म्हणाले, मी भाजपच्या कुटुंबातील एक घटक आहे. आणि भारतीय जनता पार्टीं जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या ३० वर्षापासून पक्षाचा एक शिस्तबध्द कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. आणि पक्षाने दिलेली जबाबदारी अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. भाजप हा पक्ष नसून कुटुंब आहे. आणि कुटंबाच्या पालकांनी मला उमेदवारी दिलेली आहे.

उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण कुटुंब पालकांना मुलांचं भलं चांगलं कळतं. मागच्या वेळीही मी तिकीट मागितलं होतं. पण त्यावेळी पक्षाने मुक्ता टिळकांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी मी कोणतीही नाराजी व्यक्त न करता खांद्याला खांदा लावून त्यांच्या विजयासाठी काम केलं होतं असंही रासने म्हणाले.

शैलेश टिळकांच्या नाराजीवर भाष्य करताना रासने म्हणाले, मुक्ता टिळक आणि मी एकाच प्रभागात १० वर्ष केलं आहे. आणि पुण्यात काही प्रभाग असे होते की, त्यात कोणतेही वितुष्ट नव्हते. त्यात माझा आणि मुक्ता टिळकांचा प्रभाग होता. आमच्यात अतिशय चांगलं समजूतदारपणा होता. पण त्यावेळी पक्षांने मुक्ता टिळकांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी खांद्याला खांदा लावून मी काम केलं आहे असंही हेमंत रासने (Hemant Rasne) म्हणाले.

भाजपचा खरा कार्यकर्ता तो कधीही स्वत :ची नाराजी व्यक्त करत नाही. त्याला शिस्तीची माहिती आहे. आजपर्यंत मला ज्यावेळी उमेदवारी दिली नाही.त्याविषयी मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही असेही रासने म्हणाले.

विरोधक असतातच. मला कुणाच्या नावाविषयी काहीही म्हणायचं नाही. विरोधी उमेदवाराविषयी मला आदरच आहे. पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजपनं कसबा पोटनिवडणुकीसाठी मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझा पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम आणि हजारो गणेश मंडळासह पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढविणार आहे. आणि विक्रमी मताधिक्यानं ही निवडणुक जिंकेल असा आत्मविश्वासही हेंमत रासने यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT