Balbharati-Paud Phata Road Project Sarkarnama
पुणे

Pune : पर्यावरणवाद्यांना मोठा धक्का; बालभारती-पौड फाटा रस्त्यावरील स्थगिती कोर्टाने उठवली

High Court Clears Balbharati-Paud Phata Road Project : प्रचंड विरोध असलेला वेताळ टेकडीवरून बालाभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पावर गत दीड वर्षांपासूनची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे.

ब्रीजमोहन पाटील

पुणे : प्रचंड विरोध असलेला वेताळ टेकडीवरून बालाभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पावर गत दीड वर्षांपासूनची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. शिवाय या रस्त्याला विरोध करणारी पर्यावरण प्रेमी आणि चेतना मंचची याचिकाही फेटाळून लावली आहे. या आदेशामुळे पुणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्वे रोड, पौड रोड, लॉ कॉलेज रोड आणि सेनापती बापट रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने बालभारतीपासून थेट पौड फाट्यापर्यंत रस्ता प्रस्तावित केला. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार, हा रस्ता बालभारती येथून सुरु होता. वेताळ टेकडीवरून विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून जाऊन केळेवाडी येथील पौड फाट्याजवळ संपतो. यासाठी 252 कोटी 13 लाख रुपये खर्च प्रस्तावित केला.

पण पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पावर तीव्र आक्षेप घेतला. हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमी नागरिक आणि संघटनांनी यास विरोध केला. पाण्याचे झरे आटतील, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल, पुण्यातील (Pune) टेकड्या, जैवविविधता नष्ट केली जात आहे असे आरोप होऊ लागले. तसेच एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला गेला.

या रस्त्याच्या विरोधात हजारो नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता. नागरिकांच्या विरोधामुळे सत्ताधाऱ्यांनीही या रस्त्याबाबत सावध भूमिका घेतली होती. पण महानगरपालिका या रस्त्यासाठी आग्रही होती. या कामासाठी सप्टेंबर 2023 मध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार होती, पण नागरिकांचा विरोध वाढल्याने हे काम थांबवण्यात आले. त्याचवेळी हा प्रकल्प पर्यावरण विरोधी असल्याचा आरोप करत नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली. त्यामध्ये या कामावर स्थगिती देण्यात आली होती.

मात्र आता ही स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. हा रस्ता करताना महापालिकेने योग्य प्रक्रियेचा अवलंब केला आहे, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने रस्त्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. आता या काही रस्त्याचा काही भाग जमिनीवरून तर काही भाग हा उन्नतमार्ग (इलोव्हेटेड) असणार आहे. या उन्नत मार्गामुळे टेकडी फोडावी लागणार नाही असा दावा महापालिकेने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT