Murlidhar Mohol
Murlidhar Moholsarkarnama

Murlidhar Mohol : कार्यकर्त्याला मारहाण, मंत्री मुरलीधर मोहोळ संतापले; म्हणाले, 'खपवून घेणार नाही...'

BJP Worker Devendra Jog Murlidhar Mohol Police :भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्यात आल्यानंतर सपत्नीक देवेंद्रच्या घरी पोहोचले.त्यांनी देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेतला.
Published on

Pune News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्ती असलेल्या भाजप कार्यकर्त्याला गजानन मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी या भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. आणि हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा थेट गुंडांना दिला आहे.

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्यात आल्यानंतर सपत्नीक देवेंद्रच्या घरी पोहोचले.त्यांनी देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर दिला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे.

Murlidhar Mohol
Muslim Politics : मुस्लिम समाजाची राष्ट्रवादीला पसंती; काँग्रेससाठी धोक्याची घंटा

आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही मुरलधीर मोहोळ यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही. असे मोहोळ म्हणाले.

तसेच आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती पावले उचलण्याबाबतही पोलिस आयुक्तांना त्यांनी सूचना केल्या आहेत.

तिघांना अटक

देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गजा मारणे टोळीतील तिघांना अटक केली आहे. अमोल तापकीर, ओम तीर्थराम, किरण पडवळ अशी अटक केलेल्या संशयांची नावे आहे. तर बाबू पवार हा गजा मारणेचा भाचा फरार आहे. या चौघांविरोधातही भारतीय न्याय संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murlidhar Mohol
Aditya thackeray 'आदित्य ठाकरेंना कधीही अटक होऊ शकते', पक्षातील माजी नेत्याने केला खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com