Anand Dave statement on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांचा पण विद्यानंद बापट होत आहे.प्रसिद्धी मिळाली की तारतम्य निघून जाते आणि माणूस कोणतेही निर्णय घेऊ लागतो.मुंढे यांचे आत्ता असेच होऊ लागले आहे, अशी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली.
मुंढे हे अप्रत्यक्षरित्या ते भ्रष्टाचारासच प्रोत्साहन देत आहेत. सामुदायिक जेवणावळीसाठी मान्यता घेणं, हा नियम अतिरेकी आहे.या मान्यता कशा मिळतात, नाही तर किती धक्के खावे लागतात हे सर्वांना माहीत आहे. यातून नेमक काय साध्य होणार आहे. उद्या घरातील जेवणाची पण परवानगी घ्यायला सांगतील, असे देखील ते म्हणाले.
बापट यांना झालेल्या मारहाणाबाबत बोलताना दवे म्हणाले,विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण यांचे कोणीही समर्थन करणार नाही. अतिशय चुकीचे झाले आहे. परंतु ते ज्या पद्धतीने रिअॅक्ट होत होते.
डीजेनंतर मिरवणूक बंद, मांडव नको, वारीसुद्धा बंद असे प्रकार घडत असताना आम्हाला सुद्धा वाटत होतं की दुर्देवी रिअॅक्शन आली आहे. एक दोन पोरांनी रागाच्या भरात एकदोन चापटी मारल्या पण ज्या प्रकारे हल्ला झाला वेगैरे रंगवेल जात आहे, यातून पुण्याची आणि गणेशभक्तांचे नाव बदनाम केलं जात आहे.
एक-दोन कानाखाली मारणं, गचंडी पकडणं, असं पुण्यात दररोज हजारोने होत असतं, पोलिस स्टेशनला बोलावलं जातं, एनसी नोंदवून सोडलं जातं. येवढं सोप असताना पुणेकरांचा आणि गणेशोत्सवाचे नाव खराब करण्यासारख्या बातम्या मीडियाने करू नये, असे आम्हाला हिंदू महासभा म्हणून वाटतं, असे देखील ते म्हणाले. तसेच माझी तयारी आहे विद्यानंद बापटजी तुमच्या बरोबर जाहीर प्रतिवाद करण्याची, सांगा केव्हा आणि कोठे करायची', असे आव्हान देखील त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.