Fadnavis on Bapat Attack: विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य! पुन्हा संदिग्ध विधान? म्हणाले, एकमेकांना समजून...

Fadnavis on Bapat Attack: पुण्यात गुरुवारी दोन महत्वाच्या घटना घडल्या. यामध्ये जनमाणसांत प्रसिद्ध असलेल्या दोन पुणेकर व्यक्तींवर बाका प्रसंग ओढवला.
Devendra Fadnavis_Vidyanand Bapat
Devendra Fadnavis_Vidyanand Bapat
Published on
Updated on

Fadnavis on Bapat Attack: पुण्यात गुरुवारी दोन महत्वाच्या घटना घडल्या. यामध्ये जनमाणसांत प्रसिद्ध असलेल्या दोन पुणेकर व्यक्तींवर बाका प्रसंग ओढवला. यामध्ये संतोष पंडीत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडं विद्यानंद बापट यांना एका व्यक्तीनं भर गर्दीत मारहाण केली. या दोन्ही घटना नागरिकांच्या विचार स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या होत्या. त्यामुळं या गांभीर घटना असल्यानं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis_Vidyanand Bapat
Vidyanand Bapat Attack : विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा सराईत गुन्हेगार? संतोष चव्हाणवर आधीच पाच-सहा गुन्हे दाखल; पोलिसांनी घेतले ताब्यात

बापट यांच्यावरील हल्ल्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "अशा पद्धतीनं मारहाण करणं योग्य नाही. शेवटी प्रत्यकेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यापद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. मला असं वाटतं की, एकमेकांना समजून, एकमेकांच्या भावना समजून या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाही. मी यापूर्वीही सांगितलं की, आपला गणेशोत्सव हा पारंपारिक पद्धतीकडं नेला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पहिल्या वर्षी हे शंभर टक्के होणार नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत"

दरम्यान, सातत्यानं रस्त्यावर उतरुन नागरी प्रश्नांवर भाष्य करणारे, पुणेकर नागरिक संतोष पंडीत यांना गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. संतोष पंडीत हे थेट रस्त्यावर उतरुन नागरी प्रश्नांवर बोलत असतात तसंच राजकारण आणि प्रशासनातील व्यक्तींकडून आपल्या पदाचा गैरवापर केला जात असल्याचं दिसल्यास त्याचा समोरासमोर समाचार घेतात, याचे त्यांचे रील हे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

Devendra Fadnavis_Vidyanand Bapat
Aaditya Thackeray News : नवनीत राणा यांचा विषय निघताच आदित्य ठाकरे यांचा वेगळाच अविर्भाव, म्हणाले...

तर दुसरीकडं विद्यानंद बापट हे सध्या पुण्यात प्रचंड चर्चेचा विषय बनले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्तानं शहरांमध्ये धार्मिक उत्सव आणि विविध महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये वाजवले जाणारे डीजे अथवा लाऊडस्पीकर्स याविरोधात त्यांनी सातत्यानं भूमिका लावून धरली आहे. त्यांच्या या चांगल्या कामाला माध्यमांनीही भरपूर प्रसिद्धी दिली. त्यामुळं आता सर्वसामान्य नागरिक देखील बापट यांना पाठिंबा देताना रस्त्यावर उतरुन आपला आवाज उठवत असल्याचं दिसतं आहेत. त्यामुळं ध्वनीप्रदुषणाविरोधात आता हळूहळू जनचळवळ निर्माण होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com