Daund Police
Daund Police  Sarkarnama
पुणे

Daund News : मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदू तरुणाची जबरदस्तीने केली सुंता

प्रफुल्ल भंडारी

दौंड (जि. पुणे) : दौंड (Daund) शहरात एका हिंदू (Hindu) वाल्मिकी समाजातील तरुणाने मुस्लिम (Muslim) धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याचा जबरदस्तीने सुंता केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड शहरात दहा दिवसांपूर्वी एका हिंदू विवाहितेबरोबर बळजबरीने लग्न लावल्यानंतर पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा मुलगा वसीम बादशहा शेख याला अटक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Hindu youth was forcibly circumcised for refusing to become a Muslim)

दौंड शहरातील ३४ वर्षीय तरुणाने एका मुस्लिम समाजातील विधवा महिलेबरोबर २०१८ मध्ये कुर्डूवाडी (जि. सोलापूर) येथे लग्न केले होते. दौंडमध्ये भीमा नदीकाठी एका वीट भट्टीवर तो मजूरी करीत होता. हिंदु तरूणाशी लग्न केल्याने कुमेल कुरेशी व त्याच्या सहकाऱ्यांनी त्या तरुणाच्या पत्नीला संबंधित तरुणास सोडचिठ्ठी देण्याचा प्रस्ताव देत मुस्लिम समाजातील तरुणाबरोबर लग्न लावण्याचे आश्वासन मुस्लिम दफनभूमीतील कार्यालयात दिले होते. परंतु तिने या प्रस्तावास नकार दिला होता.

दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी कुमेल कुरेशी उर्फ हाजीसाहब (रा. कुंभार गल्ली, दौंड), आसिफ शेख (पूर्ण नाव उपलब्ध नाही) व एक डॅाक्टर यांनी जबरदस्तीने त्या हिंदू तरुणाची सुंता केली. या प्रकरानंतर त्या तरुणाचे कुटुंब भीतीपोटी दौंड शहर सोडून गेले होते.

संबंधित तरुणाच्या फिर्यादीनुसार कुमेल कुरेशी, आसिफ शेख व अज्ञात डॅाक्टर यांच्याविरूध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट) आणि भारतीय दंड विधान मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही संशयित आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

संशयित आरोपी कुमेल कुरेशी हा दौंड मुस्लिम दफनभूमी व्यवस्थापन समितीचा प्रमुख आहे. पोलिस उपअधीक्षक राहुल धस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT