Pune News
Pune News Sarkarnama
पुणे

काँग्रेसला अंधश्रद्धेची लागण; शुक्राचा अस्त झाला...म्हणून पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये होम-हवन

मंगेश कोळपकर : सरकारनामा ब्यूरो

Pune News : पक्षाला भरभराट यावी, सर्व विरोधकांत एकी व्हावी, यासाठी 'सर्व सिद्धी' पुजा करून होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या (Pune) काँग्रेस भवन मध्ये घडली. धर्मनिरपेक्षता, हे तत्व अंगीकारलेल्या काँग्रेस भवनमध्ये 82 वर्षांत पहिल्यांदाच होम-हवन झाले आहे.

पुण्यातील काँग्रेस (Congress) भवनमध्ये रविवारी सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान अध्यक्षांच्या केबिनच्या शेजारील सभागृहात होम-हवन झाले आहे. पुजेचे विधी झाले. या विधींची तयारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरू होती. सर्व स्वच्छता करून दुपारी दीडच्या सुमारास त्या सभागृहाला कुलूप लावण्यात आले होते. काँग्रेस भवनमध्ये रविवारी कार्यकर्त्यांची वर्दळ कमी असते, हे लक्षात घेऊन त्यासाठी हा मुहूर्त निवडला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर मधील काँग्रेस भवनची स्थापना 1940 मध्ये झाली. काकासाहेब गाडगीळ शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. धर्मनिरपेक्षता, हे तत्व अंगीकारलेल्या काँग्रेस भवनमध्ये 82 वर्षांत पहिल्यांदाच होम-हवन झाले.

या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, "महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेस भवनमध्ये होम-हवन होणे ही चुकीची घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारांमुळे काँग्रेस, भाजपची (BJP) नक्कल करीत आहे, असे वाटू शकते. त्यामुळे काँग्रेसने या घटनेचा फेरविचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षासाठी हा आत्मघातकी प्रकार आहे."

"काँग्रेस पक्षाची भरभराट व्हावी, पक्षाचा सुवर्णकाळ पुन्हा यावा, या उद्देशाने कार्य सिद्धी पूजा केली आहे. त्यामध्ये होम-हवनही होते. तसेच विविध प्रकारच्या पुजांचाही समावेश होता. काँग्रेसचा शहराध्यक्ष मी सात जुलै रोजी झालो होतो. तेव्हापासूनच काँग्रेस भवनमध्ये पुजा करण्याचे माझ्या मनात होते. मात्र, 14 नोव्हेंबर नंतर पूजा करण्यास मला गुरूंनी सांगितले होते. शुक्राचा अस्त झाला असल्यामुळे,'' ही पूजा केल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT