Tukaram Mundhe News : अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram Mundhe) बदलीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) यांनी स्वत: पत्र लिहिले होते. सावंत यांनी लिहिलेले पत्रच समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन आता पुन्हा एकदा राजकारण तपाण्याची चिन्ह आहेत.
या पत्रात तुकाराम मुंढे हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचीही तक्रार सावंत यांनी केली आहे. तुकाराम मुंढे यांना कामकाजाच्या सुधारणेबाबत समज देऊनही सुधारणा होत नसल्याचा दावाही सावंत यांनी केल होता. आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची दोनच महिन्यात बदली झाली होती. त्या बदलीमध्ये आपला हात नसल्याचे सावंत यांनी सांगितले होते.
अधिकारी, कर्मचारी यांना धमकावणे आणि मंत्री कार्यालय संपर्क न ठेवण्याच्या सूचना मुंढे यांनी दिल्याचे पत्रात म्हटले आहे. बदलीच्या आधी मुंढे आणि मी एका बैठकीनिमित्ताने भेटलो होतो, त्यानंतर मला त्यांची बदली झाल्याचे माध्यमांमधूनच कळले असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते. यानंतर आता सावंत यांनीच लिहिलेले असल्याचे समोर आले आहे.
सावंत यांनी पत्रात म्हटले आहे की ''आशा वर्कर्स यांच्यासमोर स्फोटक वक्तव्य करून आंदोलकांच्या भावना दुखावणे, सोनवणे कार्यकारी अभियंता, यांना कामावरून काढून टाकणे. मोबाईलवरुन फोन केला असता त्याला अजिबात प्रतिसाद न देणे. मुंढे यांच्या कार्यपध्दतीमुळे डॉक्टर्स संघटना आक्रमक झाल्या आहेत.
उपरोक्त सर्व बाबी प्रशासकीय कामकाजात अक्षम्य ठरत असल्याची माझी धारणा, असल्याचे सावंत यांनी पत्रात म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही सुधारणा दिसून न येता शासनाची प्रतिमा मलिन करण्याची वृत्ती दिसून येते, असा आरोप सावंत यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे मुंढे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.