Supriya Sule, Devendra Fadnavis sarkarnama
पुणे

Supriya Sule On Devendra Fadnavis: जमत नसेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे संतापल्या..

MP Supriya Sule News : शिंदे-फडणवीस सरकारला ईडी (ED) सरकार म्हटलेलं आवडते

सरकारनामा ब्युरो

MP Supriya Sule News : राज्यात सध्या गुन्हेगारी वाढत आहे. दौंडमध्ये एकाच कुंटुबातील सात जणांची हत्या, पुण्यातील कोयता गँग, राज्यात महिलांवर सातत्याने होत असलेले अत्याचार, या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं, त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. गृहमंत्र्यालयाचे हे अपयश आहे. राज्यातील कायदा-सुवस्था राखता येत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा," "शिंदे-फडणवीस सरकारला ईडी (ED) सरकार म्हटलेलं आवडते," असा टोला सुळे यांनी यावेळी लगावला.

"महागाई आणि बेरोजगारीवर सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कारण या सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे. ED म्हणजे नक्की एकनाथ, देवेंद्र का की आणखी काही," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची खडकवासला मतदार संघात जाहीर सभा होत आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "प्रकाश आंबेडकर यांची आज सभा होत आहे, हे चांगलं आहे. सभा घेण्याचा अधिकार संविधानमध्ये सगळ्यांना आहे,"

कसबा पोटनिवडणकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. पण या परिसरात भाजपचे झेंडे लागले आहे, यामुळे भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला जात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भाजपने कसब्यात आचारसंहितेचा भंग केला याचे मला आश्चर्य वाटत नाही, कारण हे सरकार नियमाने चालत नाही कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येईल,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT