Sharad Pawar sarkarnama
पुणे

...जेव्हा शरद पवारांना मिळतो २० हजारांचा 'चेक'

शरद पवार साधना सहकारी बँकेचे पूर्वीपासून सभासद आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : साधना बॅंकेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना २० हजार रुपयाचा चेक देऊन नुकतेच गौरवण्यात आले. कारण, साधना बँकेच्या सदस्याला एक अपत्य असल्यास १० हजार रुपयांचा धनादेशाचा चेक देऊन गौरवण्यात येते. मुलगी अपत्य असल्यास सभासदाला २० हजार रुपये धनादेशाचा चेक देऊन 'साधना कन्यारत्न' पुरस्कार देण्यात येतो. त्यामुळे पवार यांना 'साधना कन्यारत्न' पुरस्काराने गौरवले आहे. अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

बँकेचे सभासद असलेले पवार यांनाही एकच कन्या आहे. त्यामुळे बॅंकेच्या संचालक मंडळाने पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन पुरस्काराचा वीस हजारांचा हा धनादेश त्यांना दिला. साधना बँकेच्या मुख्य इमारतीचे उदघाटन नुकतेच शपद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी, 'साधना कन्यारत्न' उपक्रमाचे कौतुक केले. मिश्किलपणे म्हणाले, 'मी देखील या बँकेचा सभासद आहे, व मी या योजनेस पात्र ठरतो, पण मला बँकेने या उपक्रमाचा लाभ दिला नाही.' त्यानंतर बँकेने पवार यांना गौरविले. आतापर्यंत सुमारे ४० सभासदांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

शरद पवार साधना सहकारी बँकेचे पूर्वीपासून सभासद आहेत. साधना बँकेतर्फे सभासदांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे 'कन्यारत्न योजना', याद्वारे केवळ एकच मुलगी असलेल्या सभासदांसाठी वीस हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ मिळाला नाही, अशी गंमत पवार यांनी केली होती. या गंमतीचा धागा पकडत बँकेच्या वतीने पवार साहेबांच्या नावे योजनेंतर्गत धनादेश केला.

यावेळी साधना सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी 3 मुलींना शिष्यवृत्ती योजना सुरू करत असल्याची माहिती संचालकांनी पवार यांना दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, बँकेच्या सुकाणू समितीचे सदस्य दिलीप तुपे, बँकेचे चेअरमन अनिल तुपे, संचालक चंद्रकांत कवडे, कार्यकारी संचालक भाऊ तुपे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT