मुंबई : राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील (Rajni Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी बुधवार (ता. २२ सप्टेंबर) रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
या निवडणुकीसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, रजनी पाटील यांचा अर्ज बाद होवू शकतो. त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला, असता रजनी पाटील यांनी बॅंकेचे कर्ज थकवल्याचे एक प्रकरण प्रलंबित आहे. ते लक्षात घेता पाटील यांची उमेदवारी बाद करा, असा आक्षेप भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रजनी पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात एनएसयुआयमध्ये काम करताना त्यांनी एकदा राजीव गांधींना केज दौराही घडविला होता. त्यावेळीच पहिल्यांदाच त्यांची सोनिया गांधींशी भेट आणि ओळख झाली. ‘एनएसयुआय' च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे.
राज्यसभेतील कामात काही चुक झाली का, या प्रश्नावर ‘तुमचे काम उत्तम आहे, मी, राहूल आणि पक्षाकडे त्याची नोंद असून भविष्यातही आम्ही तुमची काळजी घेऊ असे म्हणू ‘यु आर माय लॉयल सोल्जर’अशी शाबासकी देत त्यांच्या डोक्यावरुन आणि पाठीवरुन आपुलकीचा हात सोनियांनी फिरवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.