नवाब मलिक-प्रवीण दरेकर  सरकारनामा
पुणे

मजूर असलेले दरेकर पन्नास लाखाच्या मोटारीत कसे फिरतात ?

राज्यातील सरकार पडणार नाही. सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मजूर संस्थांचे काम करताना स्वत:ला मजूर म्हणवून घेणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मजूर असताना ५० लाख रूपये किंमतीच्या मोटारीत कसे काय फिरू शकतात असा सवाल अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने मंगळवारी पुण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात मलिक बोलत होते.मुंबै बँकेच्या संदर्भाने मुंबईत लावलेल्या एका होर्डिंगसाठी मला जबाबदार धरून बँकेची बदनामी केली म्हणून माझ्यावर एक हजार कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.मुळात हे होर्डिंग मी लावलेले नाही. त्यामुळे न्यायालयात या संदर्भात माझी भूमिका मी मांडणारच आहे. मात्र, दावा दाखल करण्यासाठी लागणारे पन्नास लाख रूपये दरेकर यांनी बँकेकडूनच घेतले असतील. याचा अर्थ दरेकर सातत्याने बँकेच्या पैशाचा चुकीच्या कामासाठी उपयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मलिक यांनी सांगितले.

मलिक यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘‘ फडणवीस यांचे पक्षातील महत्वदेखील दिवसेंसिवस कमी होत आहे.एकेकाळी ज्यांना पक्षाने निवडणुकीत उमेदवारीदेखील दिली नव्हती.त्या विनोद तावडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे महासचिव बनवले आहे. तावडे यांना आता पंतप्रधान मोदी यांना थेट भेटता येत आहे.’’

मलिक म्हणाले, ‘‘ राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न आम्ही करणार नाही, असे विधान फडणवीस यांनी केले आहे. मुळात त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी राज्यातील सरकार पडणार नाही. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार आहे, असा विश्‍वास मलिक यांनी व्यक्त केला.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT