Malegaon Sugar Factory-Ajit Pawar
Malegaon Sugar Factory-Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

‘सोमेश्वर’ची गावे ‘माळेगाव’ला जोडण्याशी माझा संबंध नाही; पण, त्यांचं कॉल रेकॉर्ड ऐकवलं तर तोंड दाखवणे मुश्किल होईल'

कल्याण पाचांगणे

माळेगाव (जि. पुणे) : पवासाहेब (Sharad Pawar) आणि मी बारामतीकरांचे (Baramati) अथवा माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांचे कधीही नुकसान केले नाही. ‘माळेगाव’चे विरोधक मात्र आमचे अडीच वर्षाचे सरकार पडले की लगेच १० गावे जोडण्याच्या मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये दुफळी माजवत आहेत. त्यांचे काॅल रेकाॅर्ड सभासदांना ऐकविले तर त्यांना या वयात तोंड दाखविणे मुश्किल होईल. पुणे, सातारा भागातील कारखान्यांचे विस्तारीकरण झाले आहे. त्यात बंद पडलेले कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. विस्तारीकरण झालेल्या माळेगावचे कार्यक्षेत्र खूपच कमी असल्याने ‘सोमेश्वर’ची १० गावे जोडण्याचा विचार पुढे आला. मात्र, त्या विषयाशी माझा कसलाही संबंध नाही, असा खुलासा करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी तो विषय सभासद व संचालक मंडळाच्या स्तरावर हाताळावा, असेही सूचना केली. (I have nothing to do with connecting the villages of 'Someshwar' to 'Malegaon': Ajit Pawar's position is clear)

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळ माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, सचिन सातव, संदीप जगताप, पोर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, माळेगावच्या सर्वांगिण विकासासाठी आणि सभासदांना अधिकचे दोनपैसे मिळवून देण्यासाठी पवारसाहेबांनी आजवर मोठे योगदान दिले. याकडे लक्ष वेधत पवार म्हणाले की, माळेगाव कारखान्याचा अधिकचा ऊस दर हा जास्तीचे उसाचे गाळप आणि डिस्टलरी, वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यावर अवलंबून आहे. अभिनंदनास पात्र ठरलेल्या संचालक मंडळाने गतवर्षीच्या उसाला रिकव्हरी बेसचा विचार करता राज्यात प्रथम क्रमांकाचा ३१०० रुपये प्रतिटन भाव दिला आहे. यंदाही माझ्या हस्ते मोळी टाकल्याने उसाच्या दरात माळेगाव प्रथम क्रमांकाने राज्यात पुढे आला पाहिजे.

राहिला प्रश्न गावे जोडण्याचा आणि नीरा डावा कालव्याच्या अस्तरिकणाचा. ‘माळेगाव’ला सोमेश्वर कारखान्याची १० गावे जोडण्याचा विषय भविष्यात ऊस टंचाईचा संभाव्य धोक्यातून पुढे आला. त्याचा सभासद भावांनो गैरसमज करून घेऊ नका. बंद पाईपलाईनद्वारे नीरा डावा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी हेच शहाणे विरोधक करीत होते. आता मात्र अस्तरीकरणाच्या मुद्यांवरून शेतकऱ्यांना भडकवितात, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, सुमारे १३५ वर्षाच्या कालव्याची दुरवस्था विचारात घेवून पॅचवर्कपद्धतीने धोकादायक ठिकाणी प्लॅस्टीग वगळून मजबुतीचे काम होत आहे. ती कामे झाल्यास वहन क्षमता वाढणार असून त्याचा बारामती, इंदापूर, पुरंदरमधील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अन्यथा या कामांचा निधी परत गेल्यास ब्रम्हदेव आला तरी पुन्हा ही कामे होणार नाही. त्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधीही काहीही करू शकणार नाहीत. शेवटी निर्णय तुम्ही शेतकरी घेणार आहात.

दरम्यान, आगामी गाळप हंगामाची रुपरेषा स्पष्ट करीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ३१०० रुपये अंतिम भावातील उर्वरित २२० रुपये प्रतिटन एकरकमी सभासदांना दिवाळीला देण्याचे जाहीर केले. तसेच, ७० रुपये गेटकेनधारकांना सोडल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी कामगारांनाही अधिकचा बोनस देणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी स्वागत केले, तर प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

त्यावेळी माळेगावमधील भाजपचे पुढारी फडणवीसांकडे का गेले नाहीत?

भाजपच्या काळात सातारा भागातील नेत्यांनी नीरा डावा कालव्याचे पाणी पळविले होते. तेव्हा बारामती-माळेगावचे भाजपचे नेतेमंडळी मूग गिळून गप्प बसली होती. का गेली नाहीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. जेव्हा मी सरकारमध्ये आलो आणि समन्याय पद्धतीने नीरा देवघर धरणातील पाणी पुन्हा डावा कालव्याकडे वळविले. अन्यथा येथील शेतकऱ्यांची धूळधाण झाली असती. यापुढील काळात उपलब्ध पाण्याचा शेती सिंचनासाठी विनियोग होणे गरजेचे आहे. त्यातूनच धोकादायक ठिकाणी कालव्याचे मजबूतीकरण होत आहे, अशी परखड भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT