Sharad Pawar :
Sharad Pawar : Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : धंगेकरांच्या यशाची मलाच खात्री नव्हती: कसब्याच्या विजयावर शरद पवारांनाच होती शंका

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar On Kasaba By-Elction : धंगेकर यशस्वी होतील असं लोकांकडून ऐकायला मिळंत होत, पण त्यांच्या यशाची खात्री मला स्वत:ला; नव्हती. अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बोलून दाखवली. कसब्यातील विजयानंतर आज नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- गिरीश बापट यांचा गड

त्यांचं मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून कसबा मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. दुसरी गोष्ट अशी की, खासदार गिरीश बापट यांनी स्वत: या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. बापटांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजप परिवाराशी तर संबंध होतेच पण नॉन भाजप पक्षातील लोकांशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते. त्यामुळे सहाजिकच ज्याठिकाणी बापटांनी लक्ष केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असं आमचं मत झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

धंगेकरांचं कौतुक

पण शेवटी शेवटी त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेतलेत की नाही, अशी कुजबूज आम्हाला ऐकायला आली. याचा अर्थ बापट आणि टिळक यांना डावलून काही निर्णय घेतले गेले, त्याचे काही परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा होती. पण निवडणूक झाल्यानंतर जी माहिती घेतली, की जी व्यक्ती निवडून आली ती व्यक्ती वर्षानुवर्षे कशाचीही अपेक्षा न बाळगता लोकांची काम करत होती., असं म्हणत त्यांनी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांचं कौतुकही केलं.

महाविकास आघाडी म्हणून सर्वजण लढले

आणखी एक बाब म्हणजे, तसा त्यांचा बारामतीशी संबंध आहे. लोकांनी लक्षात आणून दिलेली गोष्ट म्हणजे हा उमेदवार कधी चारचाकीत बसत नाही, दोन चाकीवरच बसतो. त्यामुळे दोन पाय असलेले जे मतदार आहेत त्या सर्वांचं लक्ष यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल जे ऐकालया मिळालं, महाविकास आघाडीचा पाठिंबा आणि आघाडीतील सर्व नेते मनापासून लढले त्याचा हा परिणाम आहे, असं आमचं निरीक्षण आहे.

- लोकांना बदल हवाय

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरं जाणं याची निश्चित काळजी घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी आता बघतोय लोकांना बदल हवा आहे. लोक आम्हाला सांगत आहेत की आम्हाला बदल हवाय आणि या बदलासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र यावं. अशी भावना सर्व राज्यातील लोकांमध्ये आहे. सगळीकडे मी हेच ऐकतो आहे.

उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की हा विजय महाविकास आघाडीचा नाही तर फक्त रवींद्र धंगेकरांचा आहे. असा सवाल विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, ज्या व्यक्तीचा विजय झाला तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे हे तरी त्यांनी मान्य केलंच ना. कारण निवडणुकीआधी त्यांची वक्तव्ये काय होती ही माझ्या वाचनात आलीच होती. त्यामुळे आता निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतायेत ही चांगलीच गोष्ट आहे. या निवडणुकीत दोन गोष्टी झाल्या, महाविकास आघाडी म्हणून सर्वजण काम करत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवाराबद्दल सरसकट सर्व स्तरावर चांगलं बोललं जात होतं. या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT