Mp Sanjay Jadhav News : सात जन्मही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही..

Shivsena : शेवटपर्यंत या पक्षाचा पाईक म्हणूनच काम करत राहीन
Mp Sanjay Jadhav-Uddhav Thackeray News
Mp Sanjay Jadhav-Uddhav Thackeray NewsSarkarnama

Nanded : मी एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना बाळासाहेब, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे मला पक्षात विविध पदावर काम करता आले. त्यामुळे ५० खोकेच काय शंभर खोके देखील माझ्या समोर ठेंगणे आहेत. बेईमानी माझ्या रक्तात नाही, या पक्षाचे सात जन्मही मी उपकार फेडू शकणार नाही, अशा शब्दात परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम दिला.

Mp Sanjay Jadhav-Uddhav Thackeray News
Chhatrapati Sambhajinagar News : औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू..

नांदेड येथील शिवगर्जना मेळाव्यात जाधव (Sanjay Jadhav) बोलत होते. हिंगोली जिल्ह्यातील मेळाव्यात आपल्याच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विधान करत जाधव यांनी शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता. (Shivsena) ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायला नको होते, किंवा मुलाला तरी मंत्री करायला नको होते, त्यामुळे चाळीस चोरांना संधी मिळाली, अशी टीका जाधव यांनी केली होती.

त्यामुळे जाधव शिंदे गटाकडे जाणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. पण हिंगोलीच्या सभेत केलेली चूक जाधव यांनी नांदेडमध्ये सुधारली. शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करतांना जाधव म्हणाले, मला पन्नास काय शंभर खोके दिले तरी ते ठेंगणे ठरतील.

बेईमानी माझ्या रक्तात नाही. ज्या पक्षाने मला पद, सर्वकाही दिले, त्या पक्षाचे उपकार मी सात जन्मही विसरू शकणार नाही. राजकीय वारसा नसतांना माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेब, उद्धवसाहेबांनी खूप काही दिली. या पक्षाची बेईमानी कदापी शक्य नाही, शेवटपर्यंत या पक्षाचा पाईक म्हणूनच काम करत राहीन, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com