Pooja Khedkar Sarkarnama
पुणे

Pooja Khedkar: पूजा खेडकर यांचे परदेशात पलायन? दिल्ली पोलिसांचे पथक रवाना...

Pooja Khedkar fled abroad after court rejected anticipatory bail plea: खेडकर यांच्यावरील आरोपांचा तपास ‘यूपीएससी’ व लालबहादूर शास्त्री अकादमीकडून सुरु आहे.दिल्लीच्या गुन्हे शाखेकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

युपीएससी परीक्षेत फसवेगिरी आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपानंतर 'यूपीएससी’ने IAS पूजा खेडकर यांची निवड रद्द केली आहे. पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील गुरुवारी पतियाळा हाऊस न्यायालयाने फेटाळला. तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

अटकेपूर्वीच पूजा खेडकर यांनी पलायन केल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच पूजा या फरार झाल्याची शक्यता आहे.त्यामुळे आता तिच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांचे पथक रवाना होणार आहे, त्या दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.

खेडकर यांच्यावरील आरोपांचा तपास ‘यूपीएससी’ व लालबहादूर शास्त्री अकादमीकडून सुरु आहे.दिल्लीच्या गुन्हे शाखेकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून पूजा खेडकर या नॉटरिचेबल आहेत, त्या कुठे आहेत? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

कागदपत्रांमध्ये फेरफार करून 'यूपीएससी'ची परीक्षा देत 'आयएएस' झालेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याचा अहवाल यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे दिला आहे.

पूजा खेडकर प्रकरणात अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवून पूजा खेळकर यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील मिळविल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर केलेल्या आपल्या विविध उद्योगामुळे पूजा खेडकर चांगल्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेल्या 'प्रतापां'ची दखल घेत केंद्र सरकारने सध्या त्यांची चौकशी सुरू केली आहे. पूजा खेडकर यांनी अनेक वेळा यूपीएससी परीक्षा दिल्या, मात्र सात वेळा त्यांनी त्यांच्या नावात फेरफार केल्याच तपासात उघड झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT