Pimpri Chinchwad civic administration update: महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला नवे आयुक्त मिळाले आहे. कोकण विभागाचे आयुक्त IAS डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
IAS बापू पवार यांची बदली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या सीईओपदी करण्यात आली आहे. सीईओपदाचा कार्यभार महेश आव्हाड यांच्याकडे होता. मात्र, त्यांची बदली पुण्यात करण्यात आली असून त्यांच्याकडे पीएमपीएमएलचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
मागील सहा महिन्यापासून पिंपरी-चिंचवडला पूर्णवेळ आयुक्त नव्हते. पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्तपदी बदल करण्यात आल्यानंतर पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिकेचे आयुक्त व प्रशासकपदाची अतिरिक्त जबाबदारी होती.
महापालिका निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. लोकप्रतिनिधी महापालिकेत आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त कोण असणार याची उत्सुकता अनेकांना होती. अखेर बुधवारी (ता.11) सामान्य प्रशासनाने बदलीचे आदेश काढत विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. सूर्यवंशी हे 2006 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
पंकज भोयर यांची बदली करत पीएमपीएमलच्या अध्यक्षपदी महेश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील सात वर्षांत पीएमपीएलला आठवा अध्यक्ष मिळाला आहे. पंकज भोयर यांची नऊ महिन्यापूर्वीच नियुक्ती झाली होती. मात्र, अवघ्या नऊ महिन्यात त्यांची बदली करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.