Tukaram Mundhe sarkarnama
पुणे

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईदरम्यान कात्रज डेअरीचा मोठा निर्णय; दूध खरेदी दर वाढवला

Katraj Dairy, Milk Procurement Price, Tukaram Mundhe: दुधातील भेसळीविरोधातील कारवाईदरम्यान कात्रज डेअरीने ग्राहकांवरील भार न वाढवता शेतकऱ्यांसाठी गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ जाहीर केली.

Sudesh Mitkar

Milk Procurement Price: राज्यात दुधातील भेसळ आणि कृत्रिम दूध निर्मिती विरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या मोहिमेमुळे संपूर्ण राज्यात दूध उत्पादन आणि संकलनात कमालीचे चढ-उतार सुरू असून एकूण दूध संकलनात कमालीची घट झाली आहे.

मात्र, अशा परिस्थितीतही पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त भार न टाकता, दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संघाने दूध विक्री दरात कोणतीही वाढ न करता, गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ जाहीर केली असून, हे नवे दर ११ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत. नव्या दूध खरेदी दराप्रमाणे गाय दूध (३.५ फॅट, ८.५ एसएनएफ): ३८.८० रूपये प्रतिलिटर इतक्या दराने खरेदी करण्यात येणार आहे तसेच म्हशीचे दूध (६.० फॅट, ९.० एसएनएफ): ५३.०० रूपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्यात येईल प्रकारच्या दुधामध्ये प्रतिलिटर १ रुपयाची दर वाढ लागू करण्यात आली आहे.

प्रशासकीय कारवाईचा परिणाम आणि कात्रज पॅटर्न

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील छुप्या भेसळबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत. अनेक ठिकाणी बनावट दूध तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त झाल्याने बाजारातील कृत्रिम दुधाचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, खुल्या बाजारात अचानक शुद्ध दुधाचा तुटवडा निर्माण झाला असून संकलनात घट झाली आहे. मात्र, त्यामुळे अनेक संस्थांची वितरण व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे काही नामांकित संस्थांच्या दूध विक्रीमध्ये वाढ झाली असून त्यामध्ये कात्रज डेअरीचा देखील समावेश आहे. त्यामुळे नागरिक भेसळी पासून वाचावे या दृष्टिकोनातून मोठमोठ्या डेअरीजचे दूध खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधाला मागणी वाढली आहे.

सध्या बाजारात दूध, पनीर आणि इतर दुग्ध जन्य पदार्थांची मागणी सातत्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्‍यांना थेट आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने संघाने खरेदी दर वाढवले आहेत. राज्य भरात दूध संकलनात घट होत असताना कात्रज डेअरीच्या दूध संकलनात वाढ व्हावी या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगीतलं जात आहे.

दर वाढीची घोषणा करताना संघाने सर्व संलग्न संस्था आणि शेतकर्‍यांना स्वच्छ, ताजे व भेसळ मुक्त दूध पुरवण्याचे आवाहन केले आहे. एक प्रकारे चांगल्या गुणवत्तेचे दूध शेतकर्‍यांकडून डेअरीला प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात दूध दर वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT