IAS Tukaram Mundhe's anti-adulteration drive has sparked fresh controversy after allegations emerged of political pressure on a Pune dairy powder plant to accept suspected adulterated milk. Sarkarnama
पुणे

Beed News : बीडमधील बड्या नेत्याच्या पत्नीची भेसळयुक्त दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी : पुण्यातील पावडर प्लांट चालकाला फोनवरून धमकावलं

Beed Milk Adulteration: राज्यात दूध भेसळीविरोधातील कारवाईदरम्यान पुण्यातील दूध पावडर प्लांटवर भेसळयुक्त दूध स्वीकारण्यासाठी बीडमधील बड्या नेत्याच्या पत्नीने कथित दबाव टाकल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामा ब्युरो

IAS Tukaram Mundhe : राज्यातील दूध भेसळीविरोधात कडक कारवाई सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील एका दूध पावडर तयार करणाऱ्या प्लांट चालकाला भेसळयुक्त दूध स्वीकारण्यासाठी बीडमधील एका बड्या नेत्याच्या पत्नीने फोनवरून दमदाटी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. संबंधित प्लांट चालकाने सुरुवातीला हे दूध नाकारले होते. मात्र, कथित दबावानंतर ते दूध स्वीकारावे लागले असल्याचे देखील बोलले जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न भेसळ व दूध भेसळखोरांविरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. यामुळे अनेक डेअरी आणि दूध पावडर प्लांट चालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी भेसळयुक्त दूध स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. दुधात रासायनिक घटक किंवा गुणवत्तेत तफावत आढळल्यास ते नाकारले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या भूमिकेमुळे दररोजचे 30 ते 35 लाख लिटर दुधाचे संकलन कमी झाल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर, आंबेगाव परिसरातील एका दूध पावडर प्लांट चालकाने दुधाचा टँकर दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी केली. यात संबंधित दूध निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने प्लांट चालकाने ते स्वीकारण्यास नकार दिला. पण हा टँकर बीड जिल्ह्यातील एका बड्या नेत्याशी संबंधित होता. बीडमध्ये या नेत्यांचे गोठे आहेत. इथला सर्व दूध व्यवसायाचे संचलन त्यांची पत्नी करते.

त्यामुळे भेसळयुक्त दूध घेण्यास नकार दिल्यानंतर या नेत्याच्या पत्नीने प्लांट चालकाला फोन करून दमदाटी केल्याची चर्चा सुरु आहे. या कथित दबावामुळे अखेर संबंधित डेअरीला ते दूध स्वीकारावे लागल्याचे सांगितले जात आहे. एफडीएकडून सुरू असलेला कारवाईचा धडाका पाहता अनेक दुधावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी आपल्याकडे येणार दूध हे चांगल्या दर्जाचे असेल याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही वेळा राजकीय दबावापोटी निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारावे लागत असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT