Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal reacts strongly to Chief Minister Devendra Fadnavis  Sarkarnama
पुणे

Baramati By-Election: काँग्रेसकडून भाजप चेकमेट? "अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यास उमेदवारी घेणार मागे"; हर्षवर्धन सपकाळांची मोठी घोषणा

Baramati By-Election: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Amit Ujagare

Baramati By-Election: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळं ही निवडणूक बिनविरोध होऊ न दिल्यानं अनेकांनी काँग्रेसवर टीकाही केली आहे. पण काँग्रेसच्या या खेळीनं भाजपला चेकमेट केल्याची आता चर्चा होत आहे. कारण ज्या अजित पवारांच्या नावावरुन राजकारण सुरु आहे, त्याच अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास उमेदवारी मागे घेण्याची अट काँग्रेसनं टाकली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनीच स्वतः हे जाहीर केलं होतं की, राज्यातील महायुती सरकारनं जर अजित पवारांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ. पण ही घोषणा उमेदवाराच्या वैयक्तिक पातळीवरील घोषणा असल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता आता तासाभरापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवरुन उमेदवार आकाश मोरे यांचं विधानच शेअर केलं आहे. खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच शेअर केल्यानं ही काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, आता भाजप्रणित महायुतीसमोर मोठा पेचप्रसंग असणार आहे. कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सातत्यानं अजित पवारांच्या अपघातप्रकरणावर अनेक गोष्टी कशा संशयास्पद आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडं शासनाकडून हा निव्वळ अपघात असल्याचं म्हटलं असून त्याच्या चौकशीचे आदेशही दिले होते. चौकशी अहवालही शासनाला सादर झाला पण अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. रोहित पवारांनी सातत्यानं विमान कंपनी व्हीएसआरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

व्हीएसआर कंपनीचा मालक आणि भाजपच्या नेत्यांचे व्यावसायिक संबंध असल्यानेच सरकार ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळंच आता काँग्रेसनं बारामतीत उमेदवारी अर्ज भरुन भाजपला गुन्हा दाखल करण्यासाठी कोंडीत पकडल्याची चर्चा आहे. पण आता काँग्रेसच्या या मागणीनंतर फडणवीसांचं महायुतीसरकार काय निर्णय घेतय? हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT