जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सरकारनामा
पुणे

त्रुटी दूर न केल्यास पुण्यातल्या रूग्णालयांवर होणार कारवाई

जिल्ह्यातील कोविड उपचाराची सुविधा नसलेल्या रुग्णालयांचेही अग्निसुरक्षा परीक्षण करण्यात यावे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सरकारी रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत समन्वय करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी.उपविभागीय आधिकारी स्तरावर दोन दिवसांत खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी. ३० नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा परीक्षणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘ जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांचे अग्निसुरक्षा आणि विद्युत परीक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. सरकारी रुग्णालयांना त्रूटीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. या रुग्णालयांच्या सुरक्षा उपाययोजनांची कामे २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत. रुग्णालयात नवीन यंत्रणा स्थापित करताना त्यासाठी विद्युत यंत्रणेत आवश्यक बदलांकडे विशेष लक्ष द्यावे’’

काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत सक्षम यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. अधिक विद्युत भार आवश्यक असलेल्या यंत्रांवर लक्ष देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. दुर्घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठी महापालिका आणि ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन अधिकाऱ्यांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी केल्या.

जिल्ह्यातील कोविड उपचाराची सुविधा नसलेल्या रुग्णालयांचेही अग्निसुरक्षा परीक्षण करण्यात यावे. आगीच्या घटनांना तत्काळ प्रतिसाद देता यावा यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात यावे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करावा. उपविभागीय अधिकारी स्तरावर येत्या दोन दिवसांत खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT