NirajSingh Lodhi and Rahul Kool Sarakarnama
पुणे

Rahul Kool : मध्य प्रदेशच्या बरगी मतदारसंघातील भाजपच्या विजयात राहुल कुल यांची महत्त्वाची भूमिका!

MP Election News : भाजपचे उमेदवार नीरजसिंह लोधी यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय यादव यांचा 40 हजार मतांनी केला पराभव

रमेश वत्रे

MP Election Result : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबिज केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या निवडक 60 आमदारांकडे विविध मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. या आमदारांमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांचाही समावेश होता.

जबलपूर जिल्ह्यातील बरगी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे होती. यासाठी ते 10 दिवस बरगी मतदारसंघात मुक्कामी होते. जिथे भाजपचे उमेदवार नीरजसिंह लोधी यांनी काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचा 40 हजार मतांनी पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेलेल्या भाजप आमदारांना पक्षाकडून संपूर्ण दिवसांचे नियोजन आखून दिले जायचे. त्यानुसार प्रत्येकजण काम करत असत. शिवाय केलेल्या कामाचा दैनंदिन अहवालही पक्षाला सादर केला जायचा. याचबरोबर जबाबदारी सोपवलेल्या मतदारसंघातील राजकीय, सामाजिक परिस्थिती, प्रमुख नागरी समस्या, जनतेमध्ये कोणाबद्दल नाराजी आहे, जनतेची कोणाला पसंती आहे, मतदारसंघातली आव्हाने काय आहेत, इत्यादींबाबत सविस्तर माहिती सादर करावी लागत होती.

या सर्वांबाबत मतदारसंघातील वस्तुनिष्ठ अहवाल कुल यांनी भाजपला दिला होता. यात कुल यांनी नीरजसिंह लोधी यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस केली होती.

या दहा दिवसांत आमदारांना कुठेही हॅाटेलमध्ये जेवणाची परवानगी नव्हती. जेवण, नाश्ता मतदारसंघातील गाव, वाडी, वस्ती, तांडा येथे कार्यकर्त्यांच्या घरी करावा लागत असे. दिवसभरात विविध संघटना, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, व्यावसायिक, जात पंचायत यांच्याशी संवाद साधण्याचेही काम होते.

आमदार कुल म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा नियोजनबद्ध प्रचार, कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट, साडेतीन महिने आधी आम्ही सुचविलेले बदल, सुधारणा यामुळे मध्य प्रदेशमध्ये लोधी व भाजपचा विजय झाला आहे.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT