Amit Shah : ''...तर 'POK' आज भारताचा भाग असता'' ; अमित शाहांचं लोकसभेत मोठं विधान!

Lok Sabha News : नेहरुंच्या चुकांचा केला आहे उल्लेख; जाणून घ्या, नेमकं काय सांगितलं आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Parliament session  : जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण विधेयकावर गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना, विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. याचबरोबर माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या काही चुकांचा फटका काश्मीरला वर्षानुवर्षे सहन करावा लागला असल्याचंही यावेळी अमित शाह यांनी बोलून दाखवलंं.

अमित शाह म्हणाले, '' जम्मू-काश्मीर पुनर्रचना संशोधन विधेयक त्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आणले गेले आहे, ज्यांच्याकडे 70 वर्षे दुर्लक्ष आणि ज्यांना अपमानित केलं गेलं. जवळपास 46,631 कुटुंब आणि 1,57,967 लोक जम्मू-काश्मीर मधून देशभरात विस्थापित होण्यास मजबूर झाले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने विधेयक आणले आहे.''

तसेच, ''जर व्होटबँकेबद्दल विचार न करता सुरुवातीसच दहशतवादास सडेतोड उत्तर दिले असते, तर काश्मिरी पंडितांना काश्मीर घाटी सोडून जावं लागलं नसतं.'' असं म्हणत काँग्रेसवर टीकाही केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
BJP MP : भाजपच्या दहा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा; दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश

याशिवाय अमित शाह(Amit Shah) यांनी राहुल गांधीवर त्यांचे नाव घेता निशाणा साधला, म्हणाले ''काहीजणांना भाषण लिहून दिलं जातं आणि ते एकच भाषण सतत सहा महिन्यांपर्यंत वाचत असतात. ते इतिहास पाहत नाही.''

तसेच, ''नेहरूंच्या काळात झालेल्या चुकांचा फटका काश्मीरला वर्षानुवर्षे सहन करावा लागला. पहिली आणि सर्वात मोठी चूक- जेव्हा आपले सैन्य जिंकत होतं, मात्र पंजाबचं क्षेत्र येताच युद्धविराम(सीजफायर) लागू करण्यात आला आणि पीओकेचा जन्म झाला. जर तीन दिवसानंतर युद्धविराम केला गेला असता, तर आज पीओके भारताचा भाग असला असता. याचबरोबर दूसरी चूक म्हणजे भारताचा अंतर्गत मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जाणे ही होती.'' असंही अमित शाह म्हणाले.

Amit Shah
Mizoram CM : मंत्री कोण, हे ठरवण्याचा अधिकार मला नाही! शपथ घेण्याआधी भावी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत

याचबरोबर ''1994 ते 2004 या कालवधीत दहशतवादी हल्ल्यांच्या एकूण 40,164 घटना घडल्या होत्या. 2004-14 सोनिया गांधी आणि मनोहन सिंह शासन काळात 7,217 दहशतवादी घटना घडल्या. तर 2014 ते 2023 नरेंद्र मोदी सरकाच्या काळात दहशतवादी घटना केवळ 2,000 घडल्या, म्हणजे या काळात दहशतवादी घटनांमध्ये 70 टक्के कमी दिसून आली आहे.'' अशी माहिती सुद्धा केंद्रीय गृहमंत्र अमित शाह यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com