Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar: रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालेल्या शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट! मुंबईत होणार पुढील उपचार? डॉक्टर नेमकं काय म्हणालेत?

Sharad Pawar Health Update: श्वसनासाठी त्रास होत असल्यानं ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उपचारांसाठी सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं दाखल करण्यात आलं होतं.

Amit Ujagare

Sharad Pawar Health Update: श्वसनासाठी त्रास होत असल्यानं ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उपचारांसाठी सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं दाखल करण्यात आलं होतं. थेट बारामतीवरुन त्यांना पुण्यातील रुग्णालयात आणण्यात आलं. इथं आल्यानंतर तातडीनं त्यांच्यावर उपचार सुरु झाले. वयोमानानुसार अधुनमधून शरद पवारांच्या तब्येतीच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्याचाच हा भाग असल्याचं सकाळी सांगण्यात आलं होतं. पण आता शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. अभिजित लोढा यांनी सांगितलं की, शरद पवारांची तब्येत स्थिर आहे. त्यांच्या सर्व तपासण्या नॉर्मल आहेत. छातीत थोडा कफ आहे, पण आता त्यांच्यावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन पातळी, हृदयगती नॉर्मल आहे, त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावलेला नाही.

दरम्यान, आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी आपल्या आजोबांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, त्यांना धावपळ, दगदग यामुळं थकवा जाणवत असून उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केलं आहे. इथं एक ते दोन दिवस उपचारासाठी त्यांना ठेवलं जाईल व गरज पडल्यास मुंबईत उपचारांसाठी घेऊन जायचं की कसं? याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT