Prakash Ambedkar, Rahul Kalate
Prakash Ambedkar, Rahul Kalate Sarkarnama
पुणे

Chinchwad By Poll Election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली; 'वंचित'चा कलाटेंना पाठिंबा

सरकारनामा ब्युरो

Chinchwad Election : कुठल्याही स्थितीत भाजपसोबत जाणार नाही. राष्ट्रवादीने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तर राहुल कलाटे यांनी २०१९ मध्ये एक लाखाहून अधिक मते घेतलीत, आदी कारणे देत वंचित बहुजन आघाडीने चिंचवडमधील अपक्ष उमेदवार कलाटे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच कलाटे योग्य उमेदवार असून त्यांना निवडून आणण्यासाठी वंचित प्रयत्न करणार असल्याचे वंचितने जाहीर केले आहे. वंचितच्या अपक्ष उमेदवार कलाटे यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे चिंचवडमधील राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वंचितने (Vanchit) प्रसिद्धी पत्रक जाहीर करून चिंचवडमधील (Chinchwad) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान वंचितने जाहीर केले होते की कुठल्याही परिस्थिती भाजपसोबत जाणार नाही. त्यानंतर वंचित राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यापैकी कुणाला पाठिंबा देणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.

आता वंचितने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची (NCP) डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र चिंचवडमध्ये निर्माण झाले आहे. तर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे अद्याप निरोप मिळाला नसल्याने कसब्याबाबत भूमिका जाहीर केली नसल्याचेही वंचितने सांगितले आहे.

ACB Trap News; हॉटेलच्या पार्टीसाठी लाच मागणारा तलाठी सेवक अटकेतवंचितने यापूर्वीच भाजपसोबत (BJP) जाणार नसल्याचे जाहीर केले होते. आता या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा पाठिंबा असल्याचे यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पवार यांच्या सूचनेनुसारच तो शपथविधी पार पडल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीने भविष्यातील भूमिका स्पष्ट केलेली नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी भूमिक स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही. त्यामुळे चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे वंचितच्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान २०१९ मध्ये राहुल कलाटे (Rahul Kalate) अपक्ष म्हणूनच लढले होते. त्यावेळी वंचितने कलाटे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना एक लाखाहून अधिक मते घेतली आहे. त्यामुळे राहुल कलाटेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे, असेही वंचितच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

वंचितच्या या पाठिंब्यामुळे चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांची डोकेदुखी वाढली आहे. आता तुल्यबळ उमेदवारांमुळे चिंचवडमधील निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT