Sambhaji Bhide Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad Protest : संभाजी भिडेंविरोधात शंभरावर संघटना आक्रमक; पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी मोर्चा

Sambhaji Bhide News: जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस या मोर्चाला परवानगी देतात का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News : वादग्रस्त वक्तव्यांबाबत गुन्हे दाखल होऊनही संभाजी भिडेंना अटक करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात कोरेगाव तहसील कार्यालयावर काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटनांनी मंगळवारी मोर्चा काढला. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही विविध राजकीय पक्ष आणि शंभरावर सामाजिक संघटना गुरुवारी (ता.१०) सकाळी थेट पोलीस आय़ुक्त कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.

जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस या मोर्चाला परवानगी देतात का, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पोलिसांची परवानगी मिळाली नाही, तरी हा मोर्चा काढण्य़ावर ब्रिगेड ठाम आहे. भिडे सातत्याने देशविघातक तसेच जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य वारंवार करीत असूनही सत्ताधारी त्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी नाराजी व्यक्त केली.

भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी २८ जूनला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली. नंतर २९ जुलैला दुसऱ्यांदा तक्रार केली. तरीही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ तसेच भिडेंना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी परवाचा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.

तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असू शकत नाही, जण गण मन हे आपले राष्ट्रगीत आणि १५ आगस्ट हा स्वातंत्र्य दिवस नाही, १५ ऑगस्टला काळा दिवस पाळून उपवास करावा, अशी बेताल वक्तव्य भिडेंनी आतापर्यंत केल्याकडे ब्रिगेडने मोर्च्यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे लक्ष वेधले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केलेला आहे, महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. महात्मा फुलेंचाही अवमान केला आहे, असे त्यात म्हटले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT