Nagar NCP News : नगर शहराचे आरोग्य बिघडले; राष्ट्रवादीची महापालिकेत औषध फवारणी...

NCP leader Abhijit Khose सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीच्या आजारात नगर शहरात धूर फवारणी औषध फवारणी करणे, योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी केला.
Nagar NCP andolan
Nagar NCP andolansarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News : नगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर मलेरिया, डेंगू सारख्या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढून उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी औषध फवारणी करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

नगर शहरातील Nagar City नागरिक सध्या विविध आजारांनी ग्रासले आहे, मात्र याकडे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच नागरिक सर्दी खोकला, थंडी ताप, यांसारख्या साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीच्या आजारात शहरात धूर फवारणी औषध फवारणी करणे, योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे NCP शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी केला.

आरोग्य विभागात विविध पदावर सक्षम अधिकारी नसल्याने नागरिकांना उपचार मिळत नाही. आरोग्य विभागात बायोलॉजीस्ट, जीवशास्त्रज्ञ, हिवताप पर्यवेक्षक, कीटकसंहारक, वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, आदी पदे रिक्त आहे. धूर फवारणीसाठी मे महिन्यातच हंगामी 50 कर्मचारी घेतले जातात, मात्र यावर्षी वेळेवर न घेतल्याने शहरात धूर फवारणी झाली नाही त्यामुळे साथीचे आजार पसरले आहे.

महानगरपालिका हद्दीमध्ये धूर फवारणी, औषध फवारणी सुरु करून त्यात सातत्य ठेवावे जेणे करून साथ रोग आटोक्यात येईल. व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

Nagar NCP andolan
Nagar Politics: 'नगर'ची जातीय तेढ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच; शिवसेनेचा आरोप !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com