Pune Hording sarkarnama
पुणे

Pune Municipal News : होर्डिंगधारक महापालिकेला जुमानेनात ! अधिकारीही गाफील

नऊशे होर्डिंगधारकांचा नूतनीकरणासाठी अर्ज ; नुसता कारवाईचा फार्स नको.

सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal News : पुण्यातील रस्त्यावर तसेच गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक (होर्डिंग) लावले जात आहेत. मोठ्या प्रमाणात लावण्यात येणाऱ्या या होर्डिंगमुळे शहरातील बकालपणा वाढत चालला असल्याचे चित्र असताना केवळ ९०० होर्डिंगधारकांनीच पालिकेकडे नूतनीकरणासाठी अर्ज केला असल्याचे समोर आले आहे, तर बाकिच्यांनी पाठ फिरवली आहे.

पुणे Pune शहरात १८०० होर्डिंग Hording अधिकृत असून यातील निम्म्याच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. होर्डिंग लावण्याच्या परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या जाहिरात फलकांवर पालिका कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून विविध रस्त्यांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी जाहिरात परवाना दिला जातो.

दरवर्षी या परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. पालिकेने १८०० जणांना जाहिरात फलक उभारण्याचा परवाना दिला असून, त्यातील केवळ ९०० जणांनी पालिकेकडे नूतनीकरणासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या परवान्याचे नूतनीकरण न करता अनेक परवानाधारक बिनधास्तपणे या फलकांवर जाहिराती लावत लाखो रुपये कमवित असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे.

जाहिरात फलकांच्या शुल्कात आकाशचिन्ह विभागाने वाढ केली आहे. त्यामुळे अनेक होर्डिंगधारकांनी परवान्याचे नूतनीकरण करण्याचे टाळले आहे. पालिकेकडे शुल्क न भरता बिनधास्तपणे जाहिरात फलकांवर जाहिराती लावून लाखो रुपये कमाविण्याचा उद्योग सुरू करण्यात आला आहे, तर बेकायदा जाहिरात फलक लावण्याचेही प्रमाणदेखील वाढले आहे.

या जाहिरात फलकांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याने यावर कारवाई होत नसल्याचा आरोप वारंवार होतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांना शहरात अधिकृत होर्डिंग किती आहेत, याची सविस्तर माहिती असेल तर बेकायदा फलकांवर कारवाई करण्यास दिरंगाई का होते, अशी विचारणा होत आहे.

कारवाई केवळ फार्स ठरू नये...

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने परवाना नूतनीकरण न केलेल्या तसेत बेकायदा जाहिरात फलकांवर आज (सोमवार) पासून कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वीदेखील पालिकेने अशा पद्धतीने कारवाई करण्याचा इशारे दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई करण्याची वेळ आली त्यावेळी माघार घेण्याच्या घटना घडल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आज सोमवारपासून सुरू होणारी ही कारवाई फार्स ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पालिकेने आत्तापर्यंत नूतनीकरण न करणाऱ्या किती जाहिरात फलकांवर कारवाई करून दंड वसूल केला, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे.

Edited by : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT