Sambhajiraje Chhatrapati news
Sambhajiraje Chhatrapati news 
पुणे

ठरलं तर! दोन दिवसात संभाजीराजे छत्रपती पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार

सरकारनामा ब्युरो

Sambhaji Chhatrapati Latest political news

पुणे : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला. कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे काय करणार असा सवाल उपस्थित होत असतानाच त्यांनी स्वत:च आपली पुढची दिशा जाहीर करण्यासाठी १२ मे रोजी पुण्यात बैठक बोलवली आहे. आता संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की! स्वतःचे राज्यात स्वतचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी नवा पक्ष स्थापन करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आज संभाजीराजे छत्रपती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून त्यांना खासदारकी देण्यात आली होती. आता कार्यकाळ संंपल्यानंतर ते भाजमध्ये प्रवेश करतात की स्वत:चा पक्ष स्थापन करतात की इतर पर्याय निवडतात, येत्या 12 मे रोजी कळणार आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पक्षात घेण्यासाठी राज्यातील अनेक राजकीय पक्षांची धडपड सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करू, असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तर, संभाजीराजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागत करु अशी इच्छा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही व्यक्त केली आहे.

3 मे रोजी खासदार पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर माझी दिशा जाहीर करणार असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, आता राजकारणात यायचं ते निश्चित आहे. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असं संभाजीराजे म्हणाले होते.

दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण असा प्रश्न विचारला असता संभाजीराजे म्हणाले होते की, "दिल्ली असो किंवा महाराष्ट्र, मला दोन्हीकडे आवडतं. राजकारणात उतरायचंय हे आता निश्चित आहे. दोन्हीकडे माझे संपर्क वाढले आहेत. शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे, या विचाराने महाराष्ट्र माझ्याकडे बघत आहे, तर शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवी, अशी दिल्लीतल्या लोकांशी इच्छा आहे. असं त्यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT