Rohit Pawar on Fadnavis Sarkarnama
पुणे

Rohit Pawar: धमकी सावंतांना,पोलीस सुरक्षा धमकी देणाऱ्याला? रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल

इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

Sudesh Mitkar

Pune News: छावा चित्रपट सध्या देशभरात बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र या चित्रपटातील काही ऐतिहासिक घटनांबाबत मतमतांतर असल्याचा पाहायला मिळत आहे. याबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर ब्राह्मण द्वेष पसरत असल्याचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

त्यानंतर इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्याला पोलीस संरक्षण देण्यात आले असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत.

इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये समोरील व्यक्ती कडून सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचं आरोप करण्यात येत आहे. कॉल करणारा व्यक्ती आपण नागपूर येथील असून आपलं नाव प्रशांत कोरडकर असल्याचं सांगत आहे.

तर दुसरीकडे प्रशांत कोरटकर यांनी माध्यमांसमोर येत हे सर्व आरोप फेटाळले असून ऑडिओ रेकॉर्डिंग मधला आवाज आपला नसल्याचा दावा केला आहे. तसंच आपली बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून कोणीतरी खोडसाळपणे हे सर्व कृत्य केल्या असल्याचा दावा देखील कोरटकर यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणानंतर कोरडकर यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्याचं बोललं जात आहे.या प्रकरणावर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत.

रोहित पवार म्हणाले, "जीवे मारण्याची धमकी इंद्रजीत सावंता यांना देण्यात आली असेल तर पोलीस सुरक्षा धमकी देणाऱ्याला कशी काय देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजे यांच्याबद्दल बदनामीकारक शब्द वापरणाऱ्या नतद्रष्टावर कारवाई करण्याऐवजी त्याला सुरक्षेचं कवच? असा आरोप रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

गृह खात्यात नेमकं चाललंय काय?

रोहित पवार म्हणाले,"पुण्यात एका अत्यंत मोठ्या गुंडाला मंत्र्याच्या एका फोनवर मकोका लावून अर्ध्या तासात पकडले जाते,परंतु मस्साजोग प्रकरणात अडीच महिने उलटूनही आरोपी सापडत नाही, परभणी प्रकरणाचा तपास पुढे सरकत नाही, याचा अर्थ काय घ्यावा? पोलीस यंत्रणा फक्त राजकीय आदेशावरच चालणार का? की राजकीय हस्तक्षेप कारवाईच्या आड येतो? असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT