Karnataka News: विधानसभेत अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना मधूनच सभागृहाच्या बाहेर जाणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी युक्ती लढवली आहे. अधिवेशनानंतर जेवण झाल्यावर थोडीसी विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्या आमदारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक विधासभा अध्यक्ष यूटू खादर यांनी हा निर्णय घेतल्याने आमदारांनी त्यांचे आभार मानले आहे. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी संयुक्त आणि विविध अधिवेशनात लंच नंतर वामकुशी घेण्यासाठी सभागृहाचे कामकाज सोडून बाहेर जाणाऱ्या आमदारांसाठी 15 आरामदायी खूर्ची (Recliners)सभागृहात ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
सभागृहात महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना आमदारांनी सभागृह सोडून बाहेर जाऊ नये म्हणून ही उपाययोजना विधानसभेच्या अध्यक्षांनी केली आहे. सभागृहातील कामकाजात सभासदांची उपस्थिती यामुळे वाढेल, अशी आशा अध्यक्षांना आहे.
सभागृहाच्या ज्येष्ठ आमदारांनी लंचनंतर डुलकी घेण्यासाठी जागेची मागणी केली होती, जर ते आराम करण्यासाठी बाहेर गेले तर दिवसभर सभागृहाच येऊ शकणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सभागृहाच्या लॅाबीमध्ये आरामदायी खूर्ची ठेवण्याचा निर्णय अध्यक्ष खादर यांनी घेतला.
या आरामदायी खूर्च्या कायमस्वरुपी न घेता भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. कारण त्यांचा उपयोग फक्त अधिवेशन काळातच करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या येथून हटविण्यात येणार आहे. अधिवेशन काळात आमदारांची उपस्थिती वाढवणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.