Pune Congress Sarkarnama
पुणे

Warkari Police Clash : वारकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज कुणाच्या इशाऱ्याने केला? काँग्रेसचा संतप्त सवाल

Pune Congress News : पुण्यात पाठिंब्यासाठी वारकरी सन्मान दिंडीचे आयोजन

सरकारनामा ब्यूरो

Pune Congress Support Warkari : पालखी प्रस्थानादरम्यान वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात काही वारकरी जखमी झाले आहेत. या प्रकरणानंतर वारकरी सांप्रदायाकडून खंत व्यक्त करण्यात आली. तर विरोधक आक्रमक झाले आहेत. भागवत संप्रदायाच्या 350 वर्षांच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती. या घटनेने वारकऱ्यांच्या श्रद्धा, आस्था आणि परंपरेला काळीमा फासला गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे. (Latest Marathi News)

वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आता काँग्रेस (Congress) रिंगणात उतरले आहे. वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज कुणाच्या इशाऱ्याने करण्यात आला? या लाठीचार्ज करून वारकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. वारकऱ्यांच्या सन्मानासाठी पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), माजी गृहमंत्री आमदार रमेश बागवे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड यांनी या सन्मान दिंडीचे नेतृत्व केले. ही वारकरी सन्मान दिंडीची अलका टॉकीज चौकापासून काढण्यात आली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच हातात 'आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो', 'आमची संस्कृती वारकरी संप्रदाय', 'महाराष्ट्राचा अभिमान' असे फलक घेऊन वारकऱ्यांना पाठिंबा दर्शविला

यावेळी किशोर मारणे, प्रवीण करपे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, चेतन जी. अग्रवाल, प्रथमेश आबनावे, संकेत गलांडे, पुष्कर अबनावे, दत्ता मांजरेकर, आयुब पठाण, उमेश काची, राजेश जाधव, गणेश साळुंखे, विशाल गुंड, प्रवीण करपे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे, बंडू शेडगे, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल, गोरख पळसकर, रुपेश पवार, रवी पठारे, नंदू जाधव, गणेश तामकर, संजय चव्हाण, रुपेश पवार, संतोष भुतकर, मयुरेश दळवी, साहील राऊत, कान्होजी जेधे, भावेश पंखेवाले, सादिक बाबाजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT