Ram Shinde Death Threat: मोठी बातमी! राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मध्य प्रदेशातून अटक

MLA Ram Shinde : जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
MLA Ram Shinde
MLA Ram Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : भाजपाचे आमदार राम शिंदे यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या युवकाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आमदार राम शिंदे यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या युवकाला नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केलं आहे.

या धमकी प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात या युवकावर गुन्हा दाखल झाला होता. सागर सुभाष गवासणे (वय ३४) असं या युवकाचं नाव असून तो जामखेड तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

MLA Ram Shinde
Raju shetti: शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रश्नावर राजू शेट्टी आक्रमक; मुख्यमंत्र्यांना विचारणार जाब !

सागर गवासणे या युवकाने एका व्यक्तीच्या मोबाईलवर फोन करत तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन, अशी धमकी दिली होती. या धमकीने अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तसेच या धमकीचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून घटनेचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

MLA Ram Shinde
Ram Shinde Threatened: आमदार राम शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल

यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. अखेर संशयित आरोपी मध्यप्रदेश येथे उज्जैन व इंदौर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला उज्जैन परिसरातून ताब्यात घेतलं असून पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान, राम शिंदे यांना धमकी देणाऱ्या संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द नगर आणि इतर काही जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com