iran and pune police .jpg Sarkarnama
पुणे

Pune News: धक्कादायक! लोणी काळभोरमध्ये इराणचे झेंडे, अली खामिनींचं पोस्टर झळकलं; पुणे पोलीस प्रशासनात खळबळ

Iran VS Israel War news : गेल्या काही दिवसांपासून इराणी नागरिक परिसरामध्ये घोषणाबाजी करत असल्याची नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आता थेट इराणचे झेंडे व अली खामेनींचे फ्लेक्सच लागल्याने लोणी काळभोरसह परिसरात खळबळ उडाली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल आणि इराणमध्ये युद्ध भडकलं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना आव्हान देत वार-प्रतिवार सुरू केले आहेत. या दोन्ही देशामधील बिघडलेल्या संबंधांमुळे जगभरामध्ये चिंतेचा विषय ठरत चालला आहे. तसेच आगामी काळात इस्त्राईल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकणार असल्याचं चित्र चिन्हे आहेत. पण आता याचदरम्यान, पुण्यातून (Pune) एक धक्कादायक प्रकार समोर आल्यानं पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

इस्त्राईल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी अनेक मुस्लिम राष्ट्रमधून इराणच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या अली खामिनी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात लोक उतरल्याचा पाहायला मिळत आहेत. आता पुण्यामध्ये देखील इराणचे झेंडे आणि खामिनींचे पोस्टर झळकल्याने एकच खळबळ झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन भागामध्ये चक्क इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि राज्याध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

तसेच मागील काही दिवसांपासून इराणी नागरिक परिसरामध्ये घोषणाबाजी करीत असल्याची नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे झेंडे व फ्लेक्स लागल्याने लोणी काळभोरसह परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत लोणी काळभोर पोलीसकडे (Pune Police) कारवाईची मागणी मागणी केली होती.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर , लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश खांडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार रामहरी वणवे, रवी आहेर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

विषय संवेदनशील असल्याने पोलिसांनी इराणी समाजाची समजूत काढली आणि परवानगी घेऊनच फ्लेक्स लावा अशा सूचना केल्या. तसेच अन्यथा तुमच्यावर कायदेशीर करण्यात येईल असा इशारा देखील दिला.

यावेळी इराणी समाजाने मान्य केले असून परवानगी घेतल्याशिवाय हे पोस्टर लावणार नाही असं आश्वासन दिले आहे. त्यानंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सर्व फ्लेक्स पोलीस प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT