Sangram Jagtap Objectionable Remarks: जगताप, पडळकर अन् लांडगेविषयी अपशब्द वापरणे भोवले; गुन्हा दाखल होताच दौंडचा शेख पसार

FIR Registered For Offensive Remarks on BJP Leaders: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणे भोवले.
Sangram Jagtap objectionable remarks
Sangram Jagtap objectionable remarksSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Political Case : हिंदुत्वाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप अलीकडच्या काळात भलतेच आक्रमक आहेत. याच मुद्यावर ते स्वकीयांसह टार्गेट देखील होत आहेत.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे आणि आमदार जगताप यांनी मध्यंतरी मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर जगताप अन् पडळकरांवर दौंडमधील माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याने आक्षेपार्ह टीका केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात बादशहा शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यातील काही आमदार व भाजप (BJP) पदाधिकारी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधाने करीत असल्याने त्याचा निषेध करून कारवाईच्या मागणीसाठी दौंड पोलिस ठाण्यावर शुक्रवारी मोर्चा काढला होता. सकल मुस्लिम समाजाच्या या मोर्चानंतर बोलताना माजी नगराध्यक्ष शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड) याने आक्षेपार्ह विधाने केली होती.

अहिल्यानगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी अतिशय गलिच्छ विधान करीत आमदारांना झोडपण्याची धमकी शेख याने दिली होती.

त्याचबरोबर जत (जि. सांगली) मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरून बादशहा शेख याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याकरिता चिथावणीखोर भाषण केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Sangram Jagtap objectionable remarks
Ahilyanagar fake currency case : सराईत गुन्हेगारांनी थाटला बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांना भनक अन्...

अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात निलेश बांगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिस ठाण्यासमोरच आमदारांना झोडपण्याची धमकीनंतर दौंड पोलिसांनी बादशहा शेख याच्याविरोधात अद्याप तरी कारवाई केलेली नाही.

आता अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पोलिस बादशहा शेखविरोधात काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. बादशहा शेख याच्या तपासासाठी कोतवाली पथक रवाना झालं असून, तो पसार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sangram Jagtap objectionable remarks
Chhagan Bhujbal fake news : मंत्री भुजबळांच्या मृत्यूची खोटी पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल; सायबर पोलिस गुन्हेगारांच्या मागावर

बादशहा शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी

बादशहा शेख याच्याविरुद्ध विनयभंग, हिंदू विवाहितेवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या वसीम बादशहा शेखच्या मुलाला गुन्ह्यात सहकार्य करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याबरोबरच आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार महेश लांडगे यांच्याविषयी बादशहा शेख याने अपशब्द वापरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com