बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या मीही बातम्याच पाहिल्या आहेत. मध्यंतरी त्यांचं माझं बोलणंही झालं होतं, आम्ही संपर्कात आहोत, या बाबत वस्तुस्थिती माहिती करून घेऊनच मी यावर बोलेन, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. (Is MP Amol Kolhe on the way to BJP? Ajit Pawar gave this answer...)
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू आहे. शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनालाही ते अनुपस्थित होते. त्याचबरोबर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले आहे. तत्पूर्वी शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या निमित्ताने ते मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटले हेाते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर विरोधी पक्षनेते पवार यांनी आज स्पष्टीकरण दिले.
राज्यापुढे अनेक महत्वाचे प्रश्न उभे असताना नको त्या गोष्टींवरील वादविवादाला अर्थ नाही, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. महागाई, बेरोजगारी, राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहेत. रब्बीच्या खरीपाच्या पेरण्या अडचणीत आहेत. पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे, असे असताना ज्या गोष्टीला अनेक वर्षे उलटून गेलेली आहेत, त्यांचा उल्लेख करुन वाद निर्माण करण्याला अर्थ नाही. कोणीही हे करु नये, असे माझे मत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.