राज्यपाल कोश्यारींचे वक्तव्य; 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने के...आज गडकरी है...'

Bhagatsingh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Governer Bhagatsingh Koshiyari
Governer Bhagatsingh KoshiyariSarkarnama
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असे वक्तव्य केले. आता या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे.

Governer Bhagatsingh Koshiyari
वनहक्क जमिनींच्या प्रकरणांचा निपटारा करा अन्यथा मोर्चा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या ६२ व्या दिक्षांत समारंभावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डि. लीट पदवी देवून सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, गडकरी आणि पवार दोन्ही नेते द्रष्टे आहेत. पीएचडी आणि डि. लीट पदवी पेक्षा दोन्ही नेत्यांचं कर्तृत्व मोठं आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही नेत्यांची प्रशंसा केली.

दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है., असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल म्हणाले, मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.

Governer Bhagatsingh Koshiyari
Aimim : डोक्यावर नोटांची उधळण सुरू होती, अन् इम्तियाज जलील टाळ्या वाजवत होते..

आता राज्यपाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या आधीही राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.