Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule on NCP Split : राष्ट्रवादीत फुट पडली की नाही ? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं

NCP Politics : मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आम्ही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला

सरकारनामा ब्यूरो

Pune Politics : राष्ट्रवादीत फुट पडली नाही, असं वक्तव्य काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होते. त्यावर आज सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत,' राष्ट्रवादीत कोणतीही फुट पडली नाही, ही आमची भूमिका ठाम आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादीत फूट पडली की नाही, अजित पवार यांची वेगळी भूमिका मान्य आहे, का असे सवाल सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीच्या नऊ आमदार आणि दोन खासदारांनी वेगळी भूमिका मांडली. या आठ आमदार आणि दोन खासदारांविरोधात आम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या अध्यक्षांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आम्ही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला, पण आमच्यातील एका नेत्याने मणिपूर सरकारच्या समर्थनात मतदान केले. या देशात महिलांवर अन्याय, अत्याचार होणार असतील, मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाले, त्यांच्या बाजूने समर्थन करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करते. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण अविश्वास प्रस्तावावेळी आमच्यातील एका खासदाराने त्यांच्या बाजूने मतदान केले. त्या पूर्वी आमच्यातील आठ आमदार आणि दोन खासदारांविरोधात आम्ही अपात्रतेचे पत्र विधानसभा आणि लोकसभेच्या अध्यक्षांना दिले आहे. आता विधानसभा आणि लोकसभेच्या अध्यक्षांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.

संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादीत दोन गट पडलेत, त्यातले काही जण मंत्रीही झाले, तरीही तुम्ही पक्षात फुट पडली नाही, असं म्हणताय, आमदारांच्या अपात्रतेचे पत्र विधानसभा आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पाठवले आहे. 'माझं आणि संजय राऊतांचे बोलणे झाले, त्यांनी मला असं काही सांगितलं नाही. माझं बोलणं स्पष्टपणे ऐकून घ्या,राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT