Supriya Sule on Ajit Pawar : 'दादाला जो निर्णय योग्य वाटला तो त्याने घेतला ; सुप्रिया सुळे स्पष्टीकरण

Maharashtra NCP Politics: सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेमुळे चर्चा होऊ लागल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Supriya Sule on Ajit Pawar:
Supriya Sule on Ajit Pawar:Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : ''राष्ट्रवादी काँग्रेसमधून नऊ आमदार आणि दोन खासदार बाहेर पडले. पण तो विचार आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारा नाही. त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे संभ्रम नाही. पण, प्रोफेशनली आणि संविधानाच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला निर्णय घेण्याच अधिकार आहे. दादाला जो निर्णय योग्य वाटला त्याने तो घेतला, त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. असा खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

 गुरूवारी खासदार सुप्रिया सुळे यांनीही असंच विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळातही एकच चर्चा रंगली होती. "आमच्यातील काही जणांनी वेगळा निर्णय घेतला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही, हे स्पष्ट आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्याने त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Supriya Sule on Ajit Pawar:
Pawar Vs Shinde Group : मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांच्या निशाण्यावर दादा भुसे; ‘तसं बोलण्याची गरज नव्हती....’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'जे नेते बाहेर पडले, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांना आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र दिलं आहे. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाला मान्य नाही, आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारी नाही. त्यांचा निर्णय आमच्या पक्षाच्या विचारधारेल पटणारा नाही, त्यावर काय कारवाई करायची हा अध्यक्षांचा निर्णय असेल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Supriya Sule on Ajit Pawar:
Ajit Pawar Pune Daura: अजितदादा पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; दहा सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, काय आहे कारण ?

अजित दादांचं नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राला मान्य आहे. पण त्यांनी केलेले आरोप वास्तवतेला धरून नव्हते. ते आम्हाला वेदना देणारे होते. पण काही आरोप न पटणारे होते. पण त्याच त्याच गोष्टींवर वारंवार बोलण्याने महाराष्ट्रतील बेरोजगारी कमी होणार आहे, ना कांद्यांचा भाव कमी होणार आहे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टींवर बोलण्यापेक्षा देशासमोर खूप मोठी आव्हाने आहेत. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि महाराष्ट्रात सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

तसेच माझी भाषण रोज फॉलो केली तर मी बेरोजगारी, दुष्काळाबद्दल बोलताना दिसेल. मी कोणाच्या बाजूने नाही, माझी लढाई कोणा व्यक्तीविरोधात नाही, त्यांच्या धोरणांविरोधात आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com