Kasba by-election : निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (ता.७) संपणार आहे. कसब्यातून अर्ज भरण्यासाठी कॉंग्रेसने उद्याचा (ता.६) मुहूर्त काढला. मात्र, अर्ज कोण भरणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा (Congress) उमेदवार नेमका कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह १६ जणांच्या मुलाखती झाल्या आहेत. मात्र, उमेदवार जाहीर होत नसल्याने कसब्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
उद्या सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज भरण्यास जाणार असल्याचे शहर कॉंग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अद्याप उमेदवारच ठरलेला नाही. उमेदवाराची अधिकृत घोषणा लवकर न होण्यामागे कारणदेखील मोठे आहे.
कॉंग्रेसचा उमेदवार दिल्लीतून पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात येतो. वेणूगोपाल (K.C. Venugopal) यांचा शनिवार (ता.4) वाढदिवस होता. त्यामुळे ते कुटुंबियांसोबत कार्यक्रमात आहेत. त्यामुळे आज रात्री उशीरा त्यांच्या स्वाक्षरीने धंगेकरांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
धंगेकर यांच्या व्यतिरिक्त १६ जणांमध्ये बाळासाहेब दाभेकर व माजी महापौर कमल व्यवहारे यांचीही नावे दुसऱ्या क्रमांकावर घेतली जात आहेत. मात्र, रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. २०१७ ते २०२२ या काळात धंगेकर नगरसेवक म्हणून महापालिकेत कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य होते. त्यानंतर त्यांनी कॉंगेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कसब्यातून भाजपाच्या (BJP) रासने यांच्याशी धंगेकर हेच क्षमतेने लढू शकतात, यावर एकमत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यातील कसब्याची निवडणूक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय ठेऊन ही निवडणूक काहीही करून जिंकायचीच असा चंग त्यांनी बांधला आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पटोले यांनी शनिवारपासून पुण्यात तळ ठोकला आहे. अद्याप उमेदवार ठरला नसला तरी उद्या सकाळपर्यंत उमेदवार जाहीर होईल. त्यानंतर उद्या सकाळी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.