Sunil tingare Sarkarnama
पुणे

Jagdish Mulik: वडगावशेरीचे आमदार हे आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे ; मुळीकांचा खोचक टोला

Jagdish Mulik News: महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोणताही नवीन प्रकल्प नाही.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : जी 20 परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या रस्त्यांच्या कामाचे श्रेय वडगावशेरीचे आमदार घेत आहेत. यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नसून, ते आयत्या पीठावर रेघोट्या ओढत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केली. (Latest Marathi News)

मुळीक म्हणाले, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, जी 20 परिषदेचे भारताला अध्यक्षपद प्राप्त झाले आहे. यातील तीन परिषदा या पुणे शहरात पार पडणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विकसित आणि विकसनशील देशांचे उच्चस्तरीय प्रतिनिधी या परिषदेसाठी विशेष निमंत्रित आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही संधी आहे.

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामांना या परिषेदेच्या पार्श्वभूमीवर सुरूवात झाली आहे. याच कामांच्या निमित्ताने लोहगाव विमानतळाकडे जाताना प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने तयार करणयात येत आहे. यात वडगाव शेरीच्या विद्यमान आमदारांचे कोणतेही योगदान नाही, परंतु भाजपने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असे मुळीक यांनी आमदार सुनील टिंगरे यांचं नाव न घेताच त्यांना टोला लगावला.

मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पुणे शहरासाठी कोणताही नवीन प्रकल्प, नवीन काम आलेले नाही. वडगाव शेरीतल्या विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेमुळे विकासकामे झालेली नाहीत. परंतु आता भाजपच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या विकासकामांचा श्रेय ते घेत आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घ्यायची, आणि त्याच्याच बाबतीत पत्र, निवेदनं द्यायचे, म्हणजे याचा अर्थ त्यांनी काम केले असे होत नाही. वडगावशेरीतील नागरिकांची, मतदारांची ते दिशाभूल करीत आहेत. भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत केंद्राच्या माध्यमातून सुरूअसलेल्या, तसेच नगर रस्ता, शिरूर उड्डाणपूल ही त्याची काही उदाहरणे आहेत, असे मुळीक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT