Ajit Pawar  sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजित पवारांनी भाषण सुरू असतानाच काढला डोक्यावरील फेटा, नेमकं कारण काय?

Jan Samman Rally Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, मी येवढ्या वर्ष काम करतोय. येवढ्या योजना आणल्या. पण फेटा घातलेल्या महिला कधी पाहिल्या नाहीत. ही किमया माझ्या लाडकी बहिणीची आहे.

Roshan More

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय असते. आज (शुक्रवार) जनसन्मान यात्रा इंदापूर मध्ये होती. जनसन्मान यात्रे निमित्त आयोजित सभेत अजितदादांनी गुलाबी रंगाचे जॅकेट आणि फेटा घाटला होता. गुलाबी रंगाचा फेटा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मात्र, अजितदादांचे भाषण सुरू असतानाच त्यांनी अचानक डोक्यावरील फेटा काढून टाकला.

अजित पवारांच्या या कृतीने सगळेच आवाक झाले. मात्र, दुसऱ्या क्षणी फेटा का काढून टाकला याचे कारणच अजित पवारांनी सांगून टाकले.

अजित पवार म्हणाले, काय आमच्या माय मावलींना बहि‍णींना, मुलींना फेटा शोभून दिसतोय. आपल्याला काही दिसेना म्हणून फेटा काढून टाकतोय. महिलांनो घरी जाण्याच्या आधी सेल्फी काढा आणि नवऱ्याला दाखवा, आणि सांग दादांनी कौतुक केलं.

सन्मान यात्रेला गुलाबी फेटा घातलेल्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. त्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, मी येवढ्या वर्ष काम करतोय. येवढ्या योजना आणल्या. पण फेटा घातलेल्या महिला कधी पाहिल्या नाहीत. ही किमया 'माझ्या लाडकी बहिणी'ची आहे.

सरकार पाठीशी उभे

महिलांना काही अडचणी असतील, शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर सरकार भक्कमपणे पाठीशी उभे राहते. कोणत्या सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा दिला का? आम्ही दिला. कृषीमंत्री शिवराज चौहान यांना कालच मी बीडच्या कार्यक्रमात भेटलो. त्यांना सांगितले कापूस, सोयाबीन, ऊस कांदा यांचे भाव चांगले झाले पाहिजे. ते म्हणाले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिल्लीला बोलावतो आपण यातून मार्ग काढू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT