Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
पुणे

जानकरांना हवंय कॅबिनेट मंत्रीपद : सोबत घ्यावे की नाही ते भाजपने ठरवावं

सरकारनामा ब्यूरो

पुणे: राज्यात सत्तांतर घडून शिंदे-फडणवीसांचे सरकार स्ठापन झाले आहे. सरकारमधील काही आमदारांचे मंत्रिपदी वर्णी लागली. खाते वाटपही पार पडले. विशेष म्हणजे या संपूर्ण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. मित्र पक्षांनाही यामध्ये स्थान दिले नाही. यामुळे मित्र पक्षात नाराजी उफाळून आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत, याचीही स्पष्टोक्ती केली आहे. महादेव जानकर यांनी आज (1 सप्टेंबर ) दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. .

आम्ही भाजपसोबत एनडीएत सहभागी आहोत. एनडीए सोडलेली नाही. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. याबाबत आम्ही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे. मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय आता त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाची सोबत करावी की नाही, हे भाजपने ठरवावं, असं महादेव जानकर म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. नुकतीच राष्ट्रवादीने त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. जानकर यांनी यावरही प्रतिक्रीया दिली आहे. "पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यांचंही गेलं आहे. त्या भाजपमध्येच राहणार. कुठेही जाणार नाहीत. भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT