महाधूर्त, समाजद्रोही, बेईमान : आण्णा हजारेंवर काँग्रेस नेत्याची कठोर टीका

Anna Hajare : "भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्याचे आरोप केले"
Anna Hazare News Updates
Anna Hazare News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : दिल्ली राज्य सरकारचे मद्य धोरण मागील काही काळापासून वादात सापडले आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीने अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) सरकारवर टीकेची झोड उठवली होती. दिल्लीच्या मद्य धोरणावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे (Anna Hajare) यांनी देखील केजरीवाल यांना पत्र लिहून जोरदार सुनावले होते. आता आण्णा हजारे यांच्यावर काँग्रेस नेते आणि माझी खासदार उदित राज यांनी टिका केली आहे. (Latest Marathi News)

Anna Hazare News Updates
Maharashtra Police : फडणवीसांकडून पोलिसांना मोठं गिफ्ट ; ठाकरे सरकारने बंद केलेली योजना सुरु

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे आण्णा हजारे यांच्यावर उदित राज यांनी समाजद्रोही, महाधूर्त और बेईमान अशा कठोर शब्दात टिका केली आहे. उदित राज यांनी ट्विट करत हजारे यांना सुनावले आहे. "आण्णा हजारे ही महाधूर्त व्यक्ती आहे. आण्णांनी लावलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप एक ही सिद्ध झाले नाही. लोकपालचं काय झाले? या आधीच्या ट्वीटमध्ये उदित राज म्हणतात की, "आण्णा हजारे समाजसेवक नाही तर समाजद्रोही आहेत. भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्याचे आरोप केले होते, जे नंतर बिनबुडाचे आहेत, हे सिद्ध झाले. या बेईमान माणसाने माफी मागितली पाहीजे.

Anna Hazare News Updates
Cabinet Expansion : दुसऱ्या टप्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार, मुनगंटीवार म्हणाले...

आण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून सरकारच्या मद्य धोरणावर नाराजी व्यक्त केल्यानंतर उदित राज यांनी टिका केली आहे. यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याच दरम्यान रामलीला मैदान आणि जंतर-मंतर वर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात लोकपाल नियुक्तीसाठी आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतरच आम आदमी पार्टीचा उगम झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com